गार वारा व पावसाने पारगाव परिसर 'लॉक'
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2021 04:22 IST2021-05-17T04:22:33+5:302021-05-17T04:22:33+5:30
नवे पारगाव : हातकणंगले तालुक्यातील वारणा काठच्या पारगाव परिसरात आज सकाळपासून घोंगावणारा गार वारा व सतत ठिबकणारा पाऊस यामुळे ...

गार वारा व पावसाने पारगाव परिसर 'लॉक'
नवे पारगाव : हातकणंगले तालुक्यातील वारणा काठच्या पारगाव परिसरात आज सकाळपासून घोंगावणारा गार वारा व सतत ठिबकणारा पाऊस यामुळे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील कडक लॉकडाऊन च्या पहिल्याच दिवशी जनजीवन ' लॉक ' झाले आहे. रस्ते सुनसान झाले आहेत.
चार दिवस प्रचंड उष्णतेच्या माऱ्यानंतर आज रविवारी सकाळी वातावरणात एकदम बदल झाला. दुपारी बारापर्यंत घोंगावणारा गार वारा वाहत होता. या वाऱ्याने परिसरातील काही ठिकाणी जनावरांची छपरे उडून गेली. एक वाजतापासून सतत ठिबकणारा पाऊस सुरु आहे. वादळी वाऱ्यासह पारगाव, वाठार, तळसंदे, घुणकी, चावरे, निलेवाडी, पाडळी, अंबप, अंबपवाडी, मनपाडळे गावात पाऊस सुरु आहे. किमान आज तरी माणसाला निसर्गानेच घरात बसवल्याचे चित्र पहायला मिळत आहे.