कागल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2021 04:18 IST2021-06-22T04:18:05+5:302021-06-22T04:18:05+5:30

कागल : येथील योगसाधना संस्थेच्यावतीने आंतरराष्ट्रीय योग दिन शाहू सभागृहात साजरा करण्यात आला. यावेळी ...

Paper | कागल

कागल

कागल : येथील योगसाधना संस्थेच्यावतीने आंतरराष्ट्रीय योग दिन शाहू सभागृहात साजरा करण्यात आला. यावेळी पूरक व्यायाम सूर्यनमस्कार, विविध योगासनांचा व प्राणायामाचा सराव करण्यात आला.

योगगुरु प्रमोद पाटील यांनी योग विद्येचा इतिहास व योगाचा मानवाला होणारा शारीरिक व मानसिक लाभ या विषयावर प्रबोधन केले. यावेळी पांडुरंग काळबर यांनी स्वागत तर संस्थेचे अध्यक्ष विष्णू खाडे यांनी आभार मानले. कार्यक्रमाला रघुनाथ पुंडे, आनंदराव मोरबाळे, विजयराव कदम, डॉ. राहुल तोरगलकर, प्रल्हाद गायकवाड, बाळासाहेब माळी, श्रीकांत कोरवी, सुजित पवार, आदी उपस्थित होते.

Web Title: Paper