पंत अमात्यांची आज्ञापत्रे आजही दिशादर्शक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2021 04:26 IST2021-02-11T04:26:31+5:302021-02-11T04:26:31+5:30
कोल्हापूर : हुकुमतपनाह रामचंदरपंत अमात्य यांनी लिहिलेली आज्ञापत्रे आजही दिशादर्शक आहेत. शालेय पाठ्यपुस्तकांच्या माध्यमातून ती विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचणे आवश्यक आहे, ...

पंत अमात्यांची आज्ञापत्रे आजही दिशादर्शक
कोल्हापूर : हुकुमतपनाह रामचंदरपंत अमात्य यांनी लिहिलेली आज्ञापत्रे आजही दिशादर्शक आहेत. शालेय पाठ्यपुस्तकांच्या माध्यमातून ती विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचणे आवश्यक आहे, असे मत दुर्ग अभ्यासक डॉ. अमर अडके यांनी व्यक्त केले.
पंत अमात्य बावडेकर यांच्या ३०५ व्या स्मृतिदिनी सोमवारी आयोजित व्याख्यानावेळी ते बोलत होते. हुकुमतपनाह रामचंदरपंत अमात्य बावडेकर चॅरिेटेबल ट्रस्टच्यावतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ॲड. सौरभ देशपांडे लिखित अमात्यांच्या चरित्राचे प्रकाशन माजी आमदार मालोजीराजे छत्रपती यांच्याहस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी सीआयडीचे पोलीस अधीक्षक डॉ. दिनेश बारी होते.
अडके म्हणाले, पंत अमात्य हे शूरवीर, अभ्यासू आणि प्रजाहितदक्ष असे हुकुमतपनाह होते. त्यांनी जनतेची सेवा करत असतानाच स्वराज्याच्याही रक्षणाची महत्त्वपूर्ण कामगिरी केली. पाच छत्रपतींच्या काळात त्यांनी स्वराज्याची सोबत केली. त्यांच्या आज्ञापत्रांची अंमलबजावणी आजही करणे आवश्यक आहे.
माजी आमदार मालोजीराजे, डॉ. दिनेश बारी, ॲड. सौरभ देशपांडे यांनीही यावेळी अमात्य यांच्या गौरवशाली कामगिरीचा आढावा घेतला.
यावेळी ट्रस्टचे विश्वस्त शाहीर राजू राऊत, विश्वनाथ कोरी, नीतुदेवी बावडेकर, ॲड. देवव्रत बावडेकर, ॲड. केदार मुनिश्वर, हेमंत साळोखे उपस्थित होते.
ट्रस्टचे सचिव नील पंडित बावडेकर यांनी स्वागत व प्रास्ताविक केले.
१००२२०२१ कोल पंत अमात्य
कोल्हापुरात पंत अमात्य बावडेकर यांच्या स्मृ़तिदिनी आयोजित कार्यक्रमामध्ये हुकुमतपनाह रामचंदर अमात्य चरित्राचे प्रकाशन माजी आमदार मालोजीराजे छत्रपती यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी डावीकडून ॲड. केदार मुनिश्वर, नीतुदेवी बावडेकर, ॲड. सौरभ देशपांडे, नील बावडेकर, डॉ. दिनेश बारी, विश्वनाथ कोरी, हेमंत साळोखे, राजू राऊत उपस्थित होते. (छाया : नसीर अत्तार)