पानसरे स्मृतिदिनाचे कार्यक्रम समन्वयानेच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 05:07 IST2021-02-20T05:07:17+5:302021-02-20T05:07:17+5:30
कोल्हापूर : दिवंगत ज्येष्ठ कामगार नेते गोविंद पानसरे यांच्या सहाव्या स्मृतिदिनाचे शनिवारी होणारे दोन्ही कार्यक्रम समन्वयानेच होत असल्याची माहिती ...

पानसरे स्मृतिदिनाचे कार्यक्रम समन्वयानेच
कोल्हापूर : दिवंगत ज्येष्ठ कामगार नेते गोविंद पानसरे यांच्या सहाव्या स्मृतिदिनाचे शनिवारी होणारे दोन्ही कार्यक्रम समन्वयानेच होत असल्याची माहिती गिरीश फोंडे यांनी दिली आहे. एनडीटीव्ही वाहिनीचे कार्यकारी संपादक रविशकुमार यांचा ऑनलाइन व्याख्यानाचा कार्यक्रम पूर्ण झाल्यावरच दसरा चौकात कन्हैयाकुमार यांची सभा होणार आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
पानसरे स्मृतिदिनाचे दोन्ही कार्यक्रम एकाचवेळेला होत असल्याबाबतच वृत्त लोकमतने गुरुवारी प्रसिद्ध केले होते. त्यातून पानसरे यांच्यावर वैचारिक श्रद्धा असणाऱ्या लोकांचीही अडचण होणार असल्याचे म्हटले होते. त्यावर समाजमाध्यमांतून उलटसुलट प्रतिक्रिया व्यक्त झाल्या. त्यानंतर ऑल इंडिया स्टुडंटस फेडरेशनच्या वतीने पत्रक प्रसिद्धीस देऊन त्याबाबत स्पष्टीकरण करण्यात आले आहे. त्यात म्हटले आहे की, पानसरे यांच्या स्मृतिदिनी प्रतिवर्षी वेगवेगळे कार्यक्रम होत असतात. यावेळी श्रमिक प्रतिष्ठाणने रविशकुमार यांच्या व्याख्यानाचे आयोजन केले आहे. हे व्याख्यान व एकूण कार्यक्रम ६ ते ७.३० या वेळेत आहेत. त्यामुळे तो कार्यक्रम पूर्ण झाल्यावरच एआयएसएफ व एआयवायएफच्या वतीने कन्हैयाकुमार यांची दसरा चौकातील मैदानात जाहीर सभा होईल.