शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

मोक्काअंतर्गत कारवाईत फरारी एसटी गँगचा पंकज पोवारला अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2021 18:00 IST

Crimenews Kolhapur : मोक्का गुन्ह्यातील कारवाईनंतर गेले दोन महिने पोलिसांना गुंगारा देणारा एसटी गँगचा सदस्य पंकज रमेश पोवार (वय २९, रा. ई-वॉर्ड, बाईचा पुतळा, राजारामपुरी १४वी गल्ली, कोल्हापूर) याच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने मुसक्या आवळल्या. शिये फाटा (ता. करवीर) येथे गुरुवारी पहाटे त्याला अटक केली.

ठळक मुद्देमोक्काअंतर्गत कारवाईत फरारी एसटी गँगचा पंकज पोवारला अटक अद्याप दोघे फरार : आतापर्यंत १० जणांवर अटकेची कारवाई

कोल्हापूर : मोक्का गुन्ह्यातील कारवाईनंतर गेले दोन महिने पोलिसांना गुंगारा देणारा एसटी गँगचा सदस्य पंकज रमेश पोवार (वय २९, रा. ई-वॉर्ड, बाईचा पुतळा, राजारामपुरी १४वी गल्ली, कोल्हापूर) याच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने मुसक्या आवळल्या. शिये फाटा (ता. करवीर) येथे गुरुवारी पहाटे त्याला अटक केली.

दोन महिन्यांपूर्वी संघटित गुन्ह्याप्रकरणी एसटी गँगच्या एकूण १२ जणांवर मोक्कांतर्गत कारवाई केली होती. त्यापैकी यापूर्वी १० जणांना अटक केली आहे, तर जब्बा ऊर्फ विराज विजय भोसले व विशाल प्रकाश वडर हे दोघे अद्याप फरारी आहेत. पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, कोल्हापूर शहर व परिसरात खून, जबरी चो-या, दुखापत, गर्दी-मारामारी, खूनाचा प्रयत्न, जाळपोळ आदी विविध संघटित गुन्ह्यांप्रकरणी एसटी गँगच्या १२ सदस्यांवर ६ मे रोजी पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांच्या आदेशाने मोक्काअंतर्गत राजारामपुरी पोलीस ठाण्यात गुन्हे नोंदवले. त्यातील फरारी आरोपी पंकज पोवार हा गुरुवारी सकाळी शिये फाटा येथे येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पो. नि. तानाजी सावंत व त्यांच्या पथकाने त्याला सापळा रचून अटक केली.यापूर्वीच एसटी गँगच्या साईराज दीपक जाधव, हृषीकेश ऊर्फ गेंड्या बाबासाहेब चौगुले, आसू बादशहा शेख, अर्जुन बिरसिंग ठाकूर, नितीन ऊर्फ बॉब दीपक गडीयाल, प्रसाद जनार्दन सूर्यवंशी, करण उदय सावंत, रोहित बजरंग साळोखे, (रा. मुकुंद कलकुटकी, सर्व रा. शाहूनगर, राजारामपुरी, कोल्हापूर) यांना अटक केली आहे.

गुरुवारी पोवार याला अटक केली, तर जब्बा ऊर्फ विराज भोसले व विशाल वडर (दोघे रा. शाहूनगर) हे दोघे अद्याप फरारी असून पोलिसांना गुंगारा देत आहेत. पोलीस त्यांच्या मागावर आहेत. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीkolhapurकोल्हापूरPoliceपोलिस