पंकज पाटील यांना विधानसभेची उमेदवारी मिळावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:18 IST2021-01-08T05:18:31+5:302021-01-08T05:18:31+5:30

बाबासो हळिज्वाळे लोकमत न्यूज नेटवर्क कोगनोळी : २०२३ साली येऊ घातलेल्या विधानसभेच्या निवडणुकीसाठी तरुणांचे आशास्थान असणाऱ्या माजी जिल्हा पंचायत ...

Pankaj Patil should get the candidature for the Vidhan Sabha | पंकज पाटील यांना विधानसभेची उमेदवारी मिळावी

पंकज पाटील यांना विधानसभेची उमेदवारी मिळावी

बाबासो हळिज्वाळे

लोकमत न्यूज नेटवर्क

कोगनोळी : २०२३ साली येऊ घातलेल्या विधानसभेच्या निवडणुकीसाठी तरुणांचे आशास्थान असणाऱ्या माजी जिल्हा पंचायत उपाध्यक्ष पंकज पाटील यांना उमेदवारी देण्यात यावी, अशी आग्रही मागणी निपाणी भाग काँग्रेस कार्यकर्त्यांमधून जोर धरत आहे. माजी मंत्री वीरकुमार पाटील, माजी आमदार काकासाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हालसिद्धनाथ कारखाना, कृषी उत्पन्न बाजार समिती तसेच भागातील विविध संस्था या सर्व निवडणुकीमध्ये घवघवीत यश संपादन केले आहे. जिल्हा पंचायतीचे उपाध्यक्ष, तालुका पंचायतीचे अध्यक्ष व भूविकास बँकेचे अध्यक्ष या पदावर काम करत असताना सामान्य जनतेचे हित विचारात घेऊन सर्व योजना तळागाळापर्यंत पोहोचविण्यामध्ये त्यांचा पुढाकार राहिला आहे. माजी मंत्री सतीश जारकीहोळी, माजी आमदार काकासाहेब पाटील, माजी आमदार प्रा. सुभाष जोशी, चिकोडी जिल्हा काँग्रेस अध्यक्ष लक्ष्मणराव चिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पंकज पाटील यांनी चालविलेले काँग्रेस पक्षाच्या बळकटीसाठीचे कार्य नक्कीच प्रेरणादायी आहे. त्यामुळे युवा वर्गातून पंकज पाटील यांना उमेदवारी देण्यात यावी, अशी मागणी होत आहे.

कोट...

नैसर्गिक आपत्तीमध्ये स्वतःचा जीव धोक्यात घालून सर्वसामान्य लोकांना त्यांनी मदतीचा हात दिला होता. त्यामुळे आता समाजातील सर्वच स्तरातून पंकज पाटील यांनाच उमेदवारी मिळावी, अशी मागणी जोर धरत आहे.

निपाणी मतदारसंघात गेल्या वीस वर्षांपासून त्यांनी काँग्रेस पक्षाशी एकनिष्ठ राहून ग्रामपंचायतीच्या निवडणुकीपासून ते लोकसभेच्या निवडणुकीपर्यंत काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांना निवडून आणण्यासाठी अहोरात्र परिश्रम घेतले आहेत. या एकनिष्ठतेचा विचार होऊन त्यांना विधानसभेची उमेदवारी मिळावी.

---------- अनिल चौगुले, चेअरमन प्राथमिक कृषी पत्तीन संघ

Web Title: Pankaj Patil should get the candidature for the Vidhan Sabha