शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: पर्यटकांमुळे पन्हाळगड हाउसफुल्ल; नगरपरिषदेच्या प्रवासी, वाहन कर उत्पन्नात लक्षणीय वाढ

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 24, 2025 17:52 IST

गर्दीमुळे वाहतुकीचा व वाहन पार्किंगचा प्रश्न गंभीर बनला

पन्हाळा : इतिहासाचा साक्षीदार व थंड हवेचे ठिकाण म्हणून पन्हाळगडाची महती सर्वदूर आहे. थंडगार निसर्गरम्य वातावरण, ऐतिहासिक गडकोट व किल्ले तसेच येथील प्रसिद्ध असलेले झुणका भाकर यामुळे पन्हाळगडावर पर्यटकांची नेहमीच वर्दळ असते. दिवाळीची सुट्टी तसेच शनिवार, रविवार सलग शासकीय सुट्यांमुळे पन्हाळगड पर्यटकांनी हाऊसफुल्ल झाला आहे.कोल्हापूर शहरापासून अवघ्या २० कि.मी. अंतरावर असलेल्या पन्हाळगडावर नेहमीच पर्यटकांची गर्दी असते. दिवाळीच्या सुट्टीमुळे येथील तीनदरवाजा, अंधारबाव, सज्जाकोठी, धान्याचे कोठार, पुसाटीबुरुज परिसर, तबक उद्यान, लता मंगेशकर बंगला परिसर, आकाशवाणी टॉवर परिसर, पावनगड, रेडेघाट येथे पर्यटकांचे जथेच्या जथे पहावयास मिळत आहेत. पर्यटकांच्या गदींमुळे लहान-मोठे व्यवसाय तेजीत सुरू आहेत.

वाचा : दाजीपूर जंगल सफारी पर्यटकांसाठी खुली, दिवाळी सुट्ट्यांमुळे पर्यटनस्थळे गजबजलीपर्यटकांच्या गर्दीमुळे पन्हाळा नगरपरिषदेच्या प्रवासी कर व वाहन कर यामध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. दिवाळी सुट्टीत पाच लाख रुपयांची करवसुली झाल्याचे नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांनी सांगितले. पन्हाळा गडावर सुमारे दीड लाख पर्यटकांनी विक्रमी हजेरी लावली. पन्हाळ्याचा रणसंग्राम लघुपट पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी होत असल्याचे मुख्याधिकारी चेतन कुमार माळी यांनी सांगितले.                                     भाजलेले व उकडलेले कणीस, पाणीपुरी, भेळ, रगडा, मिसळ, झुणका-भाकर या खाद्यपदार्थांवर ताव मारताना पर्यटक दिसत आहेत. गर्दीमुळे वाहतुकीचा व वाहन पार्किंगचा प्रश्न गंभीर बनला आहे. वाहतुकीच्या कोंडीमुळे नगरपरिषदेच्या इंटरप्रिटिशन हॉलच्या बाजुच्या जागेत पार्किंगची व्यवस्था करण्यात आली असल्याचे मुख्याधिकारी चेतन कुमार माळी यांनी सांगितले.

English
हिंदी सारांश
Web Title : Panhalgad Packed with Tourists; Revenue Surges for Municipal Council

Web Summary : Panhalgad is brimming with tourists, boosting municipal revenue. Diwali holidays drew record visitors to the fort known for its history and scenic beauty. The surge in tourism has significantly increased passenger and vehicle tax collections, reaching five lakh rupees.