शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

पन्हाळागडावर होणार वातावरणातील बदलांचा अभ्यास, देशातील तिसरे केंद्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2022 13:19 IST

वैश्विक आणि सौरकिरणांमुळे वातावरणातील वरच्या स्तरांमध्ये होणाऱ्या बदल, घडामोडींचा अभ्यास शिवाजी विद्यापीठामध्ये होणार आहे. त्यासाठी आवश्यक अत्याधुनिक शास्त्रीय उपकरणे विद्यापीठाच्या पन्हाळा अवकाश संशोधन केंद्रामध्ये बसविण्यात येणार

कोल्हापूर : वैश्विक आणि सौरकिरणांमुळे वातावरणातील वरच्या स्तरांमध्ये होणाऱ्या बदल, घडामोडींचा अभ्यास शिवाजी विद्यापीठामध्ये होणार आहे. त्यासाठी आवश्यक अत्याधुनिक शास्त्रीय उपकरणे विद्यापीठाच्या पन्हाळा अवकाश संशोधन केंद्रामध्ये बसविण्यात येणार आहेत. अहमदाबाद, हैदराबादनंतर अशी सुविधा असणारे कोल्हापूर हे देशातील तिसरे केंद्र ठरणार आहे, अशी माहिती कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली.केंद्र सरकारच्या अंतरिक्ष विभागांतर्गत येणाऱ्या भौतिक अनुसंधान प्रयोगशाळा, अहमदाबाद आणि शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर यांच्यात सन २०२१ मध्ये वातावरणातील मध्यांबर, दलांबर,उष्मांबर या जमिनीपासून ५० किलोमीटर ते ५०० किलोमीटर इतक्या अंतरामध्ये उत्सर्जित होणाऱ्या एकाधिक तरंगलांबीच्या प्रकाश किरणांचा अभ्यास करण्यासाठी सामंजस्य करार झाला.याअंतर्गत अहमदाबाद भौतिक अनुसंधान प्रयोगशाळेकडून सुमारे एक कोटी किमतीची उपकरणे शिवाजी विद्यापीठाच्या पन्हाळा येथील अवकाश संशोधन केंद्रामध्ये बसवण्यात येणार आहेत. ही उपकरणे बसविण्यासाठी लागणाऱ्या वेधशाळेच्या निर्मितीसाठी विद्यापीठाकडून सुमारे २२ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली. या उपकरणांमध्ये सीसीडी-आधारित मल्टीवेव्हलेंथ एअरग्लो फोटोमीटर आणि पीआरएल- एअरग्लो इन्फ्रारेड स्पेक्ट्रोग्राफ या अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारित उपकरणांचा समावेश असल्याचे कुलगुरू डॉ. शिर्के आणि पदार्थविज्ञान अधिविभागाचे डॉ. राजीव व्हटकर यांनी सांगितले.

मूलभूत संशोधन सुविधेत वाढ

अहमदाबाद, हैदराबाद, कोल्हापूर केंद्रांद्वारे एकत्रितरीत्या संशोधन करून वैश्विक, सौर किरणांमुळे वातावरणातील वरच्या स्तरांमध्ये होणाऱ्या घडामोडी, बदलांचा सविस्तर अभ्यास करता येणार आहे. त्यामुळे विद्यापीठात अवकाश संशोधनासाठी लागणाऱ्या मूलभूत संशोधन सुविधेमध्ये वाढ होणार असून याचा उपयोग संशोधक विद्यार्थ्यांना होणार असल्याचे डॉ. व्हटकर यांनी सांगितले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरweatherहवामानShivaji Universityशिवाजी विद्यापीठ