शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान सामन्याच्या दिवशीच एकनाथ शिंदेंचे X अकाऊंट हॅक; राजकीय वर्तुळात खळबळ
2
मनोज जरांगेंच्या बैठकीत मधमाशांचा हल्ला, सहकाऱ्यांनी अंगावर उपरणी टाकून पाटलांना वाचवलं
3
VIRAL : फक्त तिकीटच नाही, तरुणीचे इन्स्टाग्राम अकाऊंटही तपासले! रेल्वेतील टीटीईचा धक्कादायक प्रताप
4
लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या गर्लफ्रेंडची हत्या; सुटकेसमध्ये भरून मृतदेह १०० किमी दूर नदीत फेकला
5
५००० परदेशी लोकांना नोकरीवर बसवले, १६ हजार अमेरिकींना काढले...; ट्रम्प प्रशासनाने H-1B चा पाढाच वाचला...
6
'तुम्ही कुणाला त्रास दिला, तर अजिबात ऐकणार नाही'; अजित पवारांचा इशारा
7
निवडून आलेल्याला २ कोटी मात्र आमदार नसतानाही मला २० कोटी मिळतात; सदा सरवणकरांचं वादग्रस्त विधान
8
पंतप्रधान मोदी आज देशवासियांना संबोधित करणार; पाच वाजता कोणत्या विषयावर बोलणार?
9
शेअर बाजारातील जोखीम घटक काय असतो? तुमची गुंतवणूक वाचवून चांगला नफा कसा कमवायचा?
10
हुंड्यासाठी सुनेला मारहाण, खोलीत कोंडून विषारी साप सोडला; सासरच्यांनी गाठला क्रूरतेचा कळस
11
स्वप्नातील एसयूव्ही खरेदीची संधी! महिंद्रा स्कॉर्पिओ झाली ₹२.१५ लाखांनी स्वस्त; जाणून घ्या नवीन किंमत
12
Nagpur Crime: घरातून बाहेर पडला अन् कारमध्ये मिळाला व्यावसायिकाचा मृतदेह; मृत्यू की हत्या?
13
युद्ध युरोपच्या दाराशी! रशियन ड्रोनची नाटो देशांच्या हद्दीत घुसखोरी, तिसऱ्या महायुद्धाचा धोका वाढला?
14
नवरात्रीपासून GST चे नवे दर लागू होणार; कोणी टाळाटाळ केल्यास 'इथे' करा तक्रार; हेल्पलाइन नंबर जारी
15
नेपाळचे जेन-झी माजी पंतप्रधान ओलींचा पिच्छा सोडेनात! आता केली 'अशी' मागणी, म्हणाले...
16
पंतप्रधान नरेंद्र मोदींशी पहिली भेट कधी झाली? अमित शाहांनी सांगितला सगळा किस्सा
17
पत्नीचा 'तो' नातेवाईक पाहून संताप अनावर झाला; चिडलेल्या पतीने चाकूने वार केला! थराराने परिसर हादरला
18
H-1B व्हिसासाठी ८८ लाख रुपये फक्त 'या' लोकांनाच भरावे लागणार; व्हाइट हाउसचे स्पष्टीकरण
19
Poonam Pandey: रामायणात पूनम पांडे रावणाच्या पत्नीच्या भूमिकेत, रामलीला कमिटी म्हणते- "तिला सुधरायचं आहे..."
20
पगार फक्त ५३,०००, तरी ९ वर्षांत झाला करोडपती! कॉर्पोरेट कर्मचाऱ्याने सांगितलं गुंतवणुकीचं गुपित

पन्हाळा नगरपालिका : पाणीपट्टीत कपात कधी होणार ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 7, 2018 23:08 IST

पन्हाळा शहराला महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामार्फत कासारी नदीवरून जो पाणीपुरवठा केला जातो. त्याची दोन महिन्याला ३५0 रुपये आकारणी होत होती. मात्र, गेल्या आॅगस्ट महिन्यापासून ही पाणीपट्टी आकारणी १0५0 रुपये करण्यात आली आहे

ठळक मुद्देआश्वासन हवेत, दरवाढ तातडीने रद्द करण्याची जोरदार मागणीपरिणामी, जीवनप्राधिकरण पाणीपट्टीत वाढ करून ग्राहकांना त्रास देत असल्याचे जाणवते.

पन्हाळा : पन्हाळा शहराला महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामार्फत कासारी नदीवरून जो पाणीपुरवठा केला जातो. त्याची दोन महिन्याला ३५0 रुपये आकारणी होत होती. मात्र, गेल्या आॅगस्ट महिन्यापासून ही पाणीपट्टी आकारणी १0५0 रुपये करण्यात आली आहे. ही पाणीपट्टी रद्द होण्याची घोषणा राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी केली होती. मात्र, दोन महिने झाले तरी ही वाढीव पाणीपट्टी रद्द झाली नसल्याने मंत्री सदाभाऊ खोत यांची घोषणा हवेतच आहे. ही वाढीव पाणीपट्टी कधी कमी होणार? अशा संतप्त प्रक्रिया पन्हाळावासियांच्यातून उपस्थित होत आहेत.

१९८५ मध्ये जीवन प्राधिकरणाने कासारी नदीवरून तीन टप्प्यांत पाणी वर उचलून पन्हाळकरांना पिण्याचे पाणी मिळावे म्हणून ही सेवा सरू केली. सुरुवातीला रोज एक तास पाणी दिले जात असे, हळूहळू या पाणीपुरवठा विभागाकडे शासनाचे दुर्लक्ष होत गेल्याने व योजनेकडे कमी ग्राहक असल्याने ही पाणी योजना तोट्यात गेल्याने नगरपरिषदेकडे वर्ग करावी, असा शासनाचा आग्रह राहिला.

तथापि, पन्हाळा नगरपरिषद ही कमी लोकसंख्येची व उत्त्पन कमी असल्याने ही योजना शासनानेच चालवावी, असा निर्णय झाला. गेल्या दहा वर्षांपासून जीवन प्राधिकरण पन्हाळा शहराला एक दिवस आड पाणीपुरवठा करीत आहे. ही जुनी योजना मोडकळीस आली असून वारंवार बिघाड होत आहे. सध्या जीवन प्राधिकरणाला ही जुनी योजना चालविणे कठीण बनले असून नगरपरिषदने चालवावी म्हणून जीवनप्राधिकरण आग्रही आहे. परिणामी, जीवनप्राधिकरण पाणीपट्टीत वाढ करून ग्राहकांना त्रास देत असल्याचे जाणवते.

ही दरवाढ तातडीने रद्द करावी, अशी जोरदार मागणी पन्हाळावासियांच्यावतीने होत आहे. महिन्याभरात ही दरवाढ रद्द व्हावी, यासाठी सामान्य जनतेला सोबत घेऊन तीव्र लढा उभारण्याचा इशारा राष्ट्रावादीचे शहराध्यक्ष सखाराम काशीद, शिवसेना शहरप्रमुख मारुती माने, विशाल दुबुले, इरफान मुजावर, आदींनी दिला आहे.थकबाकी भरण्याची नामुष्की येणार1 या वाढीव पाणीपट्टीबाबत या विभागाचे राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांची नगराध्यक्षा रूपाली धडेल यांनी भेट घेऊन ही वाढीव पाणीपट्टी रद्द करण्याची मागणी केली होती. यावेळी ही अन्यायी पाणीपट्टी रद्द करण्याची घोषणा मंत्री खोत यांनी दिली होती.

2 मात्र, वाढीव पाणीपट्टी रद्द होईपर्यंत जुन्या दराने बिले बँकेत न भरता नगरपरिषदेत भरावी, असे नगरपरिषदेकडून सांगण्यात आले आहे. मात्र, याबाबत कोणतेही लेखी पत्र जीवनप्राधिकरणाकडे तसेच नगरपरिषदेकडे नसल्याने ग्राहकांत संभ्रमावस्था निर्माण झाली आहे.

3 काही ग्राहकांनी जुन्या दराने पाणी बिले भरली आहेत; पण जीवनप्राधिकरणाच्या नव्या पाणीपट्टीनुसार उर्वरित ७00 ची रक्कम ही थकबाकी दाखवून या महिन्याचे बिल देखील नव्या दराने आले नाही. त्यामुळे जर का ही वाढीव पाणीपट्टी रद्द झाली नाही, तर मात्र नव्या दराने थकबाकी भरण्याची ग्राहकांवर नामुष्की येणार असल्याची भीती काही नागरिकांनी व्यक्त केली आहे.

टॅग्स :water shortageपाणीटंचाईFortगडkolhapurकोल्हापूर