पन्हाळ्यात निवडणूक कार्यक्रम सुरू

By Admin | Updated: December 4, 2014 23:37 IST2014-12-04T22:23:34+5:302014-12-04T23:37:16+5:30

सहकारी संस्था : पहिल्या टप्प्यात ‘ड’ वर्गातील १८, तर ‘क’ वर्गातील ८४ संस्थांच्या निवडणुका

Panhala election program launched | पन्हाळ्यात निवडणूक कार्यक्रम सुरू

पन्हाळ्यात निवडणूक कार्यक्रम सुरू

कोतोली : पन्हाळा तालुक्यातील ‘ड’ वर्गातील १८, तर ‘क’ वर्गातील ८४ सहकारी संस्थांच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. एकूण १८३ संस्थांच्या निवडणुका फेब्रुवारी व मार्चअखेर पूर्ण होणार आहे.
तालुक्यातील विकास संस्था, दूध संस्था, गृहनिर्माण संस्था, पाणीपुरवठा, मजूर, औद्योगिक अशा विविध सहकारी संस्थांच्या निवडणुका प्रलंबित होत्या. त्यामुळे संचालक मंडळास तब्बल दीड वर्षाचा अतिरिक्त कालावधी मिळाला. निवडणूक प्राधिकरण नियुक्ती व लोकसभा, विधानसभा निवडणुकांमुळे या निवडणुका लांबणीवर पडल्या. मात्र, विधानसभा निवडणुकीनंतर राज्य निवडणूक प्राधिकरणाने निवडणूक जाहीर करण्यास सुरुवात केली आहे.
तालुक्यात सहकारी संस्थांचा कार्यक्रम तालुका सहकार निवडणूक अधिकारी तथा सहायक निबंधक एस. बी. येजरे यांनी जाहीर केला. ज्या सहकारी संस्थेची सभासद संख्या दोनशेपेक्षा कमी आहे, अशा विविध संस्था ‘ड’ वर्गामध्ये येतात. त्यामध्ये गृहनिर्माण, पाणीपुरवठा, औद्योगिक आणि मजूर संस्थांचा समावेश आहे, तर ‘क ’ वर्गामध्ये १० लाखांपेक्षा कमी वसूल भाग-भांडवल असणाऱ्या सेवा संस्था, पतसंस्था, दोनशेपेक्षा जास्त सभासद असलेल्या गृहनिर्माण, ग्राहक संस्था, औद्योगिक संस्था, शासकीय साहाय्य नसलेल्या प्रक्रिया संस्था (साखर कारखाने वगळून), सर्व पणन संस्था, विणकर हातमाग संस्था व कृषी संस्थांचा यात समावेश आहे. गृहनिर्माण, औद्योगिक, दूधसंस्था राजकीय सोयीसाठी स्थापन झालेल्या या संस्थांच्या आर्थिक उलाढाली कमी प्रमाणात असतात. त्यामुळे काही संस्था सुरू, तर काही बंद अशी अवस्था आहे. यामुळे कित्येक वर्षांपासून या संस्थांच्या निवडणुकाच नाहीत. मात्र, नवीन नियमानुसार निवडणुका घेणे बंधनकारक आहे. (वार्ताहर)


संस्थांनी त्वरित माहिती द्यावी : येजरे
उपरोक्त तालुक्यातील संस्थांचा निवडणूक कार्यक्रम चालू झाला असून, अद्याप ज्या संस्थांची विहित नमुन्यातील माहिती दिलेली नाही, अशा सर्व संस्थांनी माहिती लवकरात लवकर पन्हाळा कार्यालयात जमा करण्याचे आवाहन सहायक निबंधक एस. बी. येजरे यांनी केले आहे.

Web Title: Panhala election program launched

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.