शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
2
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
3
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
4
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
5
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
6
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
7
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
8
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
9
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
10
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव
11
अमेरिकेतून अदानींसाठी चांगली बातमी! 'त्या' प्रकरणात अदानी ग्रीन कंपनीला क्लीन चिट
12
ठाकरे गटाला धक्का देण्यासाठी एकनाथ शिंदेंची खेळी; शिवीगाळ करणाऱ्या दत्ता दळवींचा शिवसेनेत प्रवेश
13
'या' दिग्गज शेअरनं १ लाखांचे केले ४ कोटी रुपये, आता बोनस सोबत पुन्हा शेअर्स वाटण्याची तयारी 
14
आणखी एक सासू होणाऱ्या जावयासोबत गेली पळून, मुलीचं लग्न मोडलं अन् महिलेने...
15
VIDEO: कार्यक्रमातून बाहेर काढलं म्हणून संतापला भाजप नेता; पोलीस अधिक्षकाला माफी मागायला लावली
16
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
17
Parshuram Jayanti 2025: आईचा वध करूनही भगवान परशुराम थोर मातृपितृ भक्त कसे? वाचा त्यांचे कार्य!
18
सायबर गुन्हेगारांचा नवा फंडा; गरजू विद्यार्थ्यांच्या बँक खात्यांचा वापर करून फ्रॉड
19
Parshuram Jayanti 2025: भगवान परशुरामांनी पृथ्वी २१ वेळा नि:क्षत्रिय करण्यामागे काय होते कारण?
20
सूरज चव्हाणचा 'झापुक झुपूक' लवकरच गाठणार कोटींचा आकडा? ४ दिवसात कमावले इतके लाख

सात हजार पणत्यांनी उजळला पन्हाळा

By admin | Updated: October 24, 2014 00:17 IST

‘कोल्हापूर हायकर्स’तर्फे ‘एक पहाट पन्हाळगडावर’

कोल्हापूर : शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन करून संपूर्ण महाराष्ट्र उजळवून टाकला, त्याच महाराजांनी घडविलेले अनेक किल्ले दीपावलीच्या काळात अंधारातच असतात. हेच किल्ले उजळविण्यासाठी कोल्हापूर हायकर्सतर्फे ‘एक पहाट पन्हाळगडावर’ हा उपक्रम राबवून सुमारे सात हजार पणत्यांनी पन्हाळगड उजळविला. दीपोत्सवाची सुरुवात शिवमंदिर येथे छत्रपती संभाजी महाराज यांच्या हस्ते शिवमूर्तीचे पूजन करून झाली. याप्रसंगी डॉ. अमर आडके यांची प्रमुख उपस्थिती होती. वर्षभर गडकिल्ल्यांवर ट्रेकिंग आयोजित करणारा ग्रुप म्हणून ओळख असणाऱ्या कोल्हापूर हायकर्सने बदलत्या काळात इतिहासाचे भान सुटू नये आणि किल्ल्यांचे महत्त्व तरुणापर्यंत पोहोचावे या उद्देशाने गतवर्षीपासून हा उपक्रम राबविण्यास सुरुवात केली. कोल्हापूर हायकर्सच्या कार्याबद्दल बोलताना संभाजीराजे म्हणाले की, सागर पाटील ग्रुपच्या माध्यमातून नवनवीन उपक्रम राबवीत असतात. राज्याभिषेकासाठी रायगडी पाच किल्ल्यांवरून पाणी आणून कोल्हापूर हायकर्सने या ऐतिहासिक उत्सवात आपले योगदान दिले आहे. हा दीपोत्सवदेखील तसाच आहे. डॉ. अमर आडके यांनी या शिवमंदिराचा इतिहास उपस्थितांसमोर वर्णन केला. या दीपोत्सवासाठी खास कोल्हापुराहून सायकलवरून आलेले अनिल भोसले यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. श्रीकांत पाटील व पन्हाळा नगरपरिषदेचे मुख्याधिकारी पां. ग. मसलेकर यावेळी उपस्थित होते.दरम्यान, वीर बाजीप्रभू देशपांडे यांच्या पुतळ्याजवळ माजी नगराध्यक्ष चंद्रकांत गवंडी यांच्या प्रमुख उपस्थितीत दीपोत्सवास प्रारंभ झाला. याठिकाणी सूरज ढोली यांच्या शंभुराजे मर्दानी खेळ विकास मंचच्या पथकाने मर्दानी खेळांची प्रात्यक्षिके सादर केली. या दीपोत्सवाने संपूर्ण परिसर उजळून निघाला होता. हे पाहण्यासाठी पर्यटकांसह नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. दीपप्रज्वलनाने शिवमंदिर परिसर असा उजळला होता. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्यासाठी उभ्या केलेल्या गडांना मोठा इतिहास आहे. हा इतिहास जपण्यासाठी प्रत्येकाने पुढाकार घेतला पाहिजे. यासाठी मी व माझ्या ग्रुपने गेल्या वर्षापासून दिवाळीच्या पहाटे हा उपक्रम राबवीत आहे. यातून आम्हाला एक वेगळी ऊर्जा, प्रेरणा मिळते. - सागर पाटील, अध्यक्ष, कोल्हापूर हायकर्स