पांडुरंग तोरो यांचे निधन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2021 04:17 IST2021-07-04T04:17:14+5:302021-07-04T04:17:14+5:30
कोल्हापूर : येथील देशभक्त रत्नाप्पा कुंभार काॅलेज ऑफ काॅमर्सचे माजी शारीरिक संचालक पांडुरंग तोरो (वय ८३) यांचे निधन झाले. ...

पांडुरंग तोरो यांचे निधन
कोल्हापूर : येथील देशभक्त रत्नाप्पा कुंभार काॅलेज ऑफ काॅमर्सचे माजी शारीरिक संचालक पांडुरंग तोरो (वय ८३) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे, सुना, नातवंडे असा परिवार आहे.
दीपक वकुंदकर
कोल्हापूर : आझाद गल्लीतील दीपक शामराव वकुंदकर (वय ५०) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली असा परिवार आहे.
अशोक चव्हाण
कोल्हापूर : उचगाव (ता. करवीर) येथील अशोक बापू चव्हाण (वय ५९) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुली, आई, नातवंडे असा परिवार आहे.
मालती जगदाळे
कोल्हापूर : शाहू मिल काॅलनीतील मालती वसंतराव जगदाळे (वय ७१) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात मुलगा, सून, नातवंडे असा परिवार आहे. त्या छत्रपती शाहू कामगार इंडस्ट्रीयल हौसिंग सोसायटीच्या चेअरमन होत्या व शिवसेना माजी विद्यार्थी शहरप्रमुख कमलाकर जगदाळे यांच्या त्या मातोश्री होत.
शांताबाई करांडे
कोल्हापूर : मंडलिक वसाहतीतील शांताबाई गणपतराव करांडे (वय ८५) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात मुले, मुली, सुना, जावई, नातवंडे असा परिवार आहे.
मुहरुम बीबी हुक्केरीकर
कोल्हापूर : बाराईमाम माेहल्यातील मुहरुम बीबी बाबूराव हुक्केरीकर (वय ७७) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात भाऊ, बहीण असा परिवार आहे.