पंडितराव जाधव, वसंतराव दलाल, शारदा मोहिते यांना ‘केईए उद्योगश्री’ पुरस्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2021 04:22 IST2021-01-17T04:22:51+5:302021-01-17T04:22:51+5:30
कोल्हापूरच्या औद्योगिक विकासामध्ये मोलाची भर टाकणाऱ्या उद्योजकांचा सन्मान व्हावा आणि नव्या पिढीला त्यांच्या जीवनप्रवासातून प्रेरणा मिळावी, या उद्देशाने असोसिएशनकडून ...

पंडितराव जाधव, वसंतराव दलाल, शारदा मोहिते यांना ‘केईए उद्योगश्री’ पुरस्कार
कोल्हापूरच्या औद्योगिक विकासामध्ये मोलाची भर टाकणाऱ्या उद्योजकांचा सन्मान व्हावा आणि नव्या पिढीला त्यांच्या जीवनप्रवासातून प्रेरणा मिळावी, या उद्देशाने असोसिएशनकडून या पुरस्कारांचे वितरण केले जाते. यंदा पुरस्कारांचे अकरावे वर्ष आहे. बुधवारी वितरित होणाऱ्या पुरस्कारांचे स्वरूप स्मृतिचिन्ह, मानपत्र, शाल, श्रीफळ, रोप असे आहे. या कार्यक्रमावेळी ‘माय जर्नी फ्रॉम अन एक्सपोर्टर टू अ ग्लोबल प्लेअर’ या विषयावर उद्योजक चौधरी मार्गदर्शन करणार असल्याचे अध्यक्ष शाह यांनी सांगितले. ज्येष्ठ उद्योजक विलास चव्हाण, दिलीप चव्हाण, सुधाकर नलवडे, सूर्यकांत बुधले आणि युवा उद्योजक नितीन वाडीकर, अरुण घोरपडे यांचाही विशेष सत्कार केला जाणार असल्याचे उपाध्यक्ष हर्षद दलाल यांनी सांगितले. यावेळी सचिव दिनेश बुधले, खजानिस कमलाकांत कुलकर्णी, सहसचिव प्रसन्न तेरदाळकर, बाबासाहेब कोंडेकर, अमर करांडे, प्रदीप व्हरांबळे, प्रशांत मोरे उपस्थित होते.
चौकट
औद्योगिक वाटचालीच्या ‘म्युरल’चे उद्घाटन
असोसिएशनने कोल्हापूरच्या औद्योगिक क्षेत्राच्या वाटचालीचे ‘म्युरल’ साकारले असून त्याचे उद्घाटन उद्योजक चौधरी हे करतील. ‘उद्योगपती राम मेनन प्लाझा’ आणि फोटो गॅलरीचे उद्घाटन राधामनी मेनन यांच्या हस्ते होणार असल्याचे उपाध्यक्ष दलाल यांनी सांगितले.
फोटो (१६०१२०२१-कोल-पंडितराव जाधव (पुरस्कार), वसंतलाल दलाल (पुरस्कार), शारदा मोहिते (पुरस्कार), प्रकाश चरणे (पुरस्कार).