शहरं
Join us  
Trending Stories
1
सुप्रीम कोर्टाचा निकाल विरोधात जाण्याची भीती?; शिंदेंच्या दिल्लीवारीबाबत असीम सरोदेंचा मोठा दावा
2
१ पद, २ विभाग अन् २ आदेश; CM देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्या खात्यांमध्ये नियुक्तीवरून संघर्ष?
3
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये उद्ध्वस्त झालेले मुख्यालय पुन्हा बांधण्यासाठी जैशचा प्रमुख पुन्हा सक्रिय; मसूद अझहरने अनेकांकडे देणग्या मागितल्या
4
नवजात लेकीला कचऱ्याच्या ढिगाऱ्यात फेकलं पण 'त्याने' जीवदान दिलं, शरीराला लागलेले किडे
5
RBI च्या निर्णयानंतर गुंतवणूकदारांना झटका! विप्रोसह 'या' क्षेत्रात मोठी घसरण, कुठे झाली वाढ?
6
“जनभावनेचा आदर करणारे हे सरकार, आम्ही...”; ‘महादेवी’ परतण्याबाबत एकनाथ शिंदेचे मोठे विधान
7
लग्नाचं निमंत्रण दिलं नाही, सहकाऱ्यांनी एचआरकडे केली तरुणीची तक्रार, त्यानंतर घडलं असं काही...
8
"कित्येकांनी बलिदान दिले, शिरांचे ढीग लागले, पण धर्म सोडला नाही"- मोहन भागवत
9
एकनाथ शिंदेंची दिल्लीवारी; अमित शाहांशी बैठकीत काय चर्चा झाली? खुद्द उपमुख्यमंत्री म्हणाले...
10
"डोकं फिरवू नका, मी मंत्री, तुम्ही मलाच न सांगता...", PWD अधिकाऱ्यावर संतापले दयाशंकर सिंह
11
जगाला आपल्या धाकात ठेऊ पाहणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांची संपत्ती किती? उत्पन्नाचा खरा स्रोत कोणता?
12
एकावर एक बोनस शेअर देणार 'ही' कंपनी; सोबत डिविडंडही मिळणार; गुंतवणुकदारांना दुप्पट फायदा
13
आधार ओटीपी वापरून ITRचं ई-व्हेरिफिकेशन करा, अन्यथा रिटर्न अवैध ठरेल; पाहा संपूर्ण प्रोसेस
14
८८२ कोटींचा खर्च, २०२८ मध्ये होणार पूर्ण; ८ ऑगस्टला सीतामातेच्या जानकी मंदिराचे भूमिपूजन
15
'कायद्याच्या कचाट्यात महादेवी हत्तीला अडकवू नका, ... तोपर्यंत लढा सुरूच राहणार'; राजू शेट्टींनी स्पष्टच सांगितलं
16
वॉशिंग मशिन वापरताना ‘ही’ किरकोळ चूक जीवावर बेतली; तरुणाचा मृत्यू; करायला गेला एक आणि..
17
बुकिंग करणाऱ्या ग्राहकांवरच शाओमी उलटली; आता म्हणतेय आठवड्यात पूर्ण पैसे द्या नाहीतर...
18
Wasim Jaffer: वसीम जाफरवर मोठी जबाबदारी, आता विदर्भातील खेळाडूंना शिकवतील फलंदाजीचे धडे!
19
ICC Test Ranking : मियाँ 'मॅजिक'नंतर 'मार मुसंडी' शो! सिराजला ICC कडून मिळालं मोठं गिफ्ट
20
ITR आणि टॅक्स डेडलाईनमध्ये काय फरक आहे? शेवटची तारीख कधी? ५,००० दंडापासून वाचण्यासाठी लगेच वाचा!

सीपीआरचा पंचनामा

By admin | Updated: March 10, 2016 01:07 IST

‘भाजप’कडून खरडपट्टी : रामानंद यांना कारभार न सुधारल्यास कारवाईचा इशारा

कोल्हापूर : येथील छत्रपती प्रमिलाराजे शासकीय रुग्णालयातील गलथान आणि भ्रष्टाचारी कारभाराचा शहर भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी बुधवारी पंचनामा केला. पगार सीपीआरचा आणि डॉक्टरांची सेवा खासगी रुग्णालयात, रुग्णांची हेळसांड, औषधे उपलब्ध असतानाही बाहेरून आणण्यास सांगणे असे अनेक प्रकार उघड झाले. त्यास जबाबदार धरून प्रभारी अधिष्ठाता रामानंद यांची भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी खरडपट्टी करत कारभाराचे वाभाडे काढले. हा पंचनामा अचानक केल्याने प्रशासनाची भंबेरी उडाली. परिणामी बघ्यांची एकच गर्दी झाली होती. ‘सीपीआर’मधील मनमानी कारभाराने कळस गाठला आहे. रुग्णांना त्रास होत आहे. सर्वसामान्य, गरीब रुग्णांची आर्थिक पिळवणूक होत आहे. औषधे खरेदीमध्ये ढपला मारला जात आहे. औषधे असतानाही ती बाहेरून विकत आणण्यास सांगितले जात आहे, अशा अनेक तक्रारी वाढल्या आहेत. या पार्श्वभूमीवर सीपीआर अभ्यागत समितीचे सदस्य व भाजपचे माजी महानगर अध्यक्ष महेश जाधव, नूतन अध्यक्ष संदीप देसाई यांच्या नेतृत्वाखाली पदाधिकाऱ्यांनी सीपीआरला दुपारी बाराच्या सुमारास भेट दिली. बाह्यरुग्ण विभागाची तपासणी केली तेथे रुग्णांशी थेट संवाद साधला. त्यावेळी रुग्णांनी औषधे बाहेरून आणण्यास सांगतात, चांगले आणि काळजीपूर्वक उपचार करत नसल्याची तक्रार केली. त्यानंतर औषधे स्टॉक रजिस्टरची तपासणी केली. रजिस्टरला रुग्णाला आवश्यक असणारी अनेक औषधे असल्याचे दिसले. त्यानंतर जाधव यांनी औषधे शिल्लक असताना बाहेरून आणण्यास का सांगितले जाते, असा जाब रामानंद यांना विचारला.अपघात कक्षाची तपासणी केली. कक्षाकडे रोज येणारी ४ ते ५ विष प्राशनच्या रुग्णांना देण्यासाठी आवश्यक औषधे दिली जात नाहीत, असेही निदर्शनास आले. रुग्णांसाठीच्या बेडना गंज चढला होता. प्रसुती कक्षात वैद्यकीय अधिकारी गैरहजर होते. आयसीयू विभागातील बेड गंजलेले होते. चाके निखळून पडली होती. स्वच्छता व अन्य कामांचा ठेका एकाला आणि कामे करतात दुसरे असे प्रकारही उघड झाले. अशाप्रकारे तब्बल तीन तास सीपीआरच्या महत्त्वाच्या विभागांची झाडाझडती घेण्यात आली.यावेळी पत्रकारांशी बोलताना जाधव म्हणाले, सीपीआरला वर्षाला साडेतीन कोटी रुपयांची खरेदी केली जाते तरीही रुग्णांना बाहेरून औषधे विकत आणण्यास सांगितले जाते. त्यावरून यामध्ये काहीतरी गोलमाल असल्याचा संशय आहे. अधिष्ठाता रामानंद अकार्यक्षम आहेत. सीपीआरमध्ये गलथानपणा वाढला आहे. त्यामुळे अधिष्ठात्यांनी कारभारात सुधारणा करावी, अन्यथा शासनास कारवाई करण्यास भाग पाडू. अनेक डॉक्टरांची वैद्यकीय बिले व अन्य लाभ अडवून ठेवले आहेत तेही त्वरित देण्याची सूचना दिली आहे. यावेळी डॉ. इंद्रजित काटकर, सुभाष रामुगडे, मारुती भागोजी आदी पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.