शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

Tripuri Purnima 2025: लक्ष दिव्यांनी तेजाळला कोल्हापूरच्या पंचगंगा नदीचा घाट

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2025 15:44 IST

‘नो-लेझर’मुळे सौंदर्यात भर

कोल्हापूर : पहाटेच्या शांत, निरभ्र आकाशात कार्तिक पौर्णिमेचा चंद्र. आपलेच सौंदर्य पंचगंगेच्या शांत प्रवाहात कौतुकाने न्याहाळत होता.... दिव्यांचा शांत, सोनेरी प्रकाश परिसरातील अंधकार दूर करून आपले तेज धरणीवर पसरत होता, आसमंत आतषबाजीच्या विविध रंगांनी नटला होता, रांगोळ्यांचा गालिचा दीपोत्सवाचे सौंदर्य वाढवत होता, तर भावगीतांचे मधुर स्वर रसिक मनाला मंत्रमुग्ध करत होते... कोल्हापुरातील पंचगंगा नदीघाटावर त्रिपुरारी पौर्णिमेच्या निमित्ताने असा हा नेत्रदीपक सुखद सोहळा बुधवारी रंगला.वर्षातील सर्वांत मोठा सण असलेल्या दिवाळी सणाची सांगता होते ती त्रिपुरारी पौर्णिमेच्या दीपोत्सवाने. हा दिवस कोल्हापूरकरांसाठी पर्वणीचा असतो, त्याचे कारण म्हणजे पंचगंगा नदीघाटावर रंगणारा दीपोत्सवाचा सोहळा. दरवर्षीप्रमाणे यंदाही पहाटे चार वाजता मारुती मंदिरात आरती करून घाटावर दिवे लावण्यास सुरुवात झाली. त्याआधीच रात्रीपासून घाटावर सुरेख रांगोळ्या सजल्या होत्या. दिव्यांनी या रांगोळ्यांच्या सौंदर्यात भरच घातली.शिवमुद्रा प्रतिष्ठानचे अध्यक्ष दीपक देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली या सोहळ्याच्या ३५व्या वर्षी ५१ हजार पणत्या लावण्यात आल्या. त्यासाठी संस्थेचे ५० कार्यकर्ते कार्यरत होते. पाण्यातील मंदिरे व दीपमाळांवर व्हाइट आर्मीच्या कार्यकर्त्यांनी बोटीतून जाऊन दिवे लावले. भावभक्ती गंध ग्रुपच्या गायकांनी मराठी भावगीते सादर करून रसिकांची मने जिंकली.

‘नो-लेझर’मुळे सौंदर्यात भरगेली काही वर्षे या दीपोत्सवाला ‘लेझर शो’चे ग्रहण लागले होते. त्यामुळे दिव्यांचा सोनेरी प्रकाश झाकोळला जाऊन फक्त लाइट इफेक्ट दिसायचे. यंदा मात्र ही चूक टाळत लेझर लाइट लावले नाहीत. बराच वेळ अंधार ठेवण्यात आला. त्यामुळे दिव्यांचे नैसर्गिक तेज आणि प्रकाशाने पंचगंगा नदीघाटाचा परिसर तेजाळून निघाला.

English
हिंदी सारांश
Web Title : Kolhapur's Panchganga Riverbank Glows with Lamps on Tripuri Purnima 2025

Web Summary : Kolhapur celebrated Tripuri Purnima with a dazzling display of 51,000 lamps at the Panchganga Riverbank. The ghat was adorned with rangolis, and traditional music filled the air. Avoiding laser shows this year enhanced the natural golden light, creating a mesmerizing spectacle for all.