शहरं
Join us  
Trending Stories
1
“आपला पक्ष मुंबईत सर्वांत जास्त बलवान आहे, यंदा महापालिकेत मनसेचीच सत्ता येणार”: राज ठाकरे
2
पंतप्रधान मोदींनंतर चार तासांनी अमित शाह राष्ट्रपतींना भेटले; ५ ऑगस्टला काहीतरी मोठे घडणार....
3
IND vs ENG :मियाँ मॅजिक! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये विकट; KL राहुलनं एक कॅच सोडला
4
१७,००० कोटींचा घोटाळा! अनिल अंबानींच्या डोकेदुखीत वाढ, ED आता 'या' लोकांची चौकशी करणार
5
Post Office ची ५० वर्ष जुनी सेवा होणार बंद, तुमच्यावर काय परिणाम होणार?
6
नव्या प्रभाग रचनेला आव्हान देणाऱ्या याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या; स्थानिक निवडणुकांना हिरवा कंदील
7
६ ऑगस्टला बच्चू कडू राज ठाकरेंची भेट घेण्याची शक्यता; शेतकरी आंदोलनाला मनसेचं पाठबळ मिळणार?
8
लॉटरी लागली! टाटांच्या 'या' शेअरचे होणार १० तुकडे, १०० शेअर्सचे थेट १००० होणार, रेकॉर्ड डेट कधी?
9
मैत्रिणीचा संसार मोडला, नंतर तिच्याच नवऱ्याशी केलं लग्न; आता ३ वर्षांतच अभिनेत्रीवर घटस्फोट घेण्याची वेळ
10
Nagpur: नागपुरात मद्यधुंद अवस्थेत कार चालवणाऱ्या जवानानं ३० जणांना उडवलं, व्हिडीओ व्हायरल!
11
बदल्याची आग! आईने वडिलांना फसवून दुसरं लग्न केलं, संतापलेल्या मुलाने तिला कारने चिरडलं
12
"मराठीच्या आधी हिंदी भाषेला राजभाषेचा दर्जा मिळाला, तेव्हा महाराष्ट्रही अस्तित्वात नव्हता"
13
कैदी नंबर १५,५२८, प्रज्वल रेवण्णाचा तुरुंगातील दिनक्रम आला समोर, दररोज करावं लागेल एवढं काम   
14
Putrada Ekadashi 2025: पुत्रदा एकादशीला 'हे' नियम पाळले तरच होतो संतानसुखाचा लाभ!
15
एकनाथ शिंदेंनी केला करेक्ट कार्यक्रम, बेळगावात पक्ष बळकट होणार; अनेक मठाधिपती शिवसेनेत
16
४० व्या वर्षीही करू शकता गुंतवणुकीचा श्रीगणेशा; रिटायरमेंटच्या वेळी होऊ शकता कोट्यधीश, महिन्याला किती कराल गुंतवणूक
17
'किमान माणसासारखी तरी वागणूक...' IT अभियंता तरुणीची पोस्ट व्हायरल, म्हणाले मॅनेजरसमोरच मी...
18
Mumbai: बलात्कारानंतर गर्भवती राहिलेल्या अल्पवयीन मेहुणीची घरीच प्रसूती; भाऊजींसह बहिणीलाही अटक
19
“हिंदूंना बदनाम करण्याच्या आव्हाडांच्या आरोपांशी उद्धव ठाकरे सहमत आहेत का?”; भाजपाचा सवाल

कोल्हापुरातील पंचगंगा नदीकाठावरील ३९ गावे लावतात प्रदुषणाला हातभार, प्रदूषणमुक्तीचे आदेश कागदावरच

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2022 19:21 IST

छोटे- मोठे नाले नदीत मिसळून प्रदुषणाची तीव्रता वाढली

संदीप आडनाईककोल्हापूर : पंचगंगा नदीचा उगम सह्याद्री पर्वतातच होतो. पंचगंगा नदीखोरे म्हणजे कोल्हापूर जिल्ह्याचा आर्थिक कणा आहे. या खोऱ्यात कोल्हापूर, गांधीनगर, इचलकरंजी, हातकणंगले यासारखी नागरी आणि औद्योगिक केंद्रे येतात. तसेच या खोऱ्याच्या एकूण १२५ कि.मी लांबी मध्ये एकूण १७४ गावेही येतात. या नदीकाठावरील ३९ गावे प्रदुषणाला हातभार लावतात. अनेक गावांत कावीळ, गॅस्ट्रोसारख्या जलजन्य साथीसोबतच मासे, कासवांसारखे जलचर मृत्यूमुखी पडले आहेत. इतकेच काय इचलकरंजीतील चाळीस व्यक्तींनाही जीवानिशी जावे लागले आहे.विद्यापीठाचे सर्वेक्षणशिवाजी विद्यापीठाच्या पर्यावरणशास्त्र अधिविभागाने नदीकाठावरील १७४ गावांचे सर्वेक्षण करुन प्रदूषणाला हातभार लावणाऱ्या घटकांचे विश्लेषण केले. जलपर्णी वाढल्यामुळे पाणी दूषित झाले आहे. रासायनिक पाणी, मळीयुक्त सांडपाणी नदीत मिसळते. तसेच दुधाळी, जयंती, बापट कॅम्प, लाईन बाजारसह छोटे- मोठे नाले नदीत मिसळून प्रदुषणाची तीव्रता वाढवली आहे.प्रदूषणमुक्तीचे आदेश कागदावरचन्यायालय, हरित लवाद आणि पर्यावरण मंत्र्यांनी अनेकदा पंचगंगेच्या प्रदूषण मुक्तीचे आदेश दिले. इशारे दिले, पण, ते कागदावर राहत असल्याने पंचगंगा प्रदूषणयुक्तच राहिली. या नदीत गावागावातून मिसळणारे सांडपाणी रोखण्यासाठी नदीकाठावरील ३९ गावांमध्ये सांडपाणी प्रकल्प उभारण्यात येणार आहेत. त्यासाठी निधीही दिला आहे. गेल्या काही वर्षांत गणेशमूर्तींचे विसर्जन नदीत झाले नाही. काही ठिकाणी पाळीव जनावरांना नदीत सोडण्यावर बंदी आहे. पण या बाबी किरकोळ आहेत.

  • पंचगंगा खोऱ्यातील गावे : १७४
  • प्रदूषणास कारणीभूत ठरणारी गावे : ३९
  • कायमस्वरूपी सांडपाणी मिसळणारी गावे : २१
  • अंशत: सांडपाणी मिसळणारी गावे : १५
  • हंगामी प्रदूषण करणारी गावे : १३५

बारमाही प्रदूषण करणारी गावे २१करवीर : बालिंगे, गांधीनगर, हळदी, हणमंतवाडी, कांडगाव, कोपार्डे, कोथळी, कुडित्रे, नागदेववाडी, परिते, शिंगणापूर, उचगाव, वाकरे, वळीवडे, वरणगेहातकणंगले : चंदूर, हातकणंगले, कबनूर, रुई, शिरोली, तिळवणीशिरोळ : नांदणी, नृसिंहवाडी

मध्यम प्रदूषण करणारी गावे : ८करवीर : कळंबे तर्फ ठाणे, मोरेवाडी, पाचगाव, पाडळी बुद्रुक, वडणगेहातकणंगले : पट्टणकोडोली, रुकडीशिरोळ : शिरदवाड

थेट प्रदूषण न करणारी गावे : ५करवीर : आंबेवाडी, चिंचवाड, प्रयाग चिखली, वसगडे, शिरोळ : शिरढोण

टॅग्स :kolhapurकोल्हापूरpollutionप्रदूषण