शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

पंचायत समिती सभापती निवड : काँग्रेस, शिवसेनेकडे प्रत्येकी तीन सभापतिपदे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2019 12:04 IST

कोल्हापूर जिल्ह्यात झालेल्या पंचायत समिती सभापती निवडीमध्ये काँग्रेस आणि शिवसेनेचे प्रत्येकी तीन सभापती बनले असून, राष्ट्रवादीचे दोन सभापती झाले आहेत. हत्तरकी गट, प्रकाश आवाडे यांची ताराराणी आघाडी, तसेच जनसुराज्यचा प्रत्येकी एक सभापती बनला आहे.

ठळक मुद्देपंचायत समिती सभापती निवड : काँग्रेस, शिवसेनेकडे प्रत्येकी तीन सभापतिपदेराष्ट्रवादी, स्थानिक आघाड्यांना दोन, तर ‘जनसुराज्य’कडे एक सभापतिपद

कोल्हापूर : जिल्ह्यात झालेल्या पंचायत समिती सभापती निवडीमध्ये काँग्रेस आणि शिवसेनेचे प्रत्येकी तीन सभापती बनले असून, राष्ट्रवादीचे दोन सभापती झाले आहेत. हत्तरकी गट, प्रकाश आवाडे यांची ताराराणी आघाडी, तसेच जनसुराज्यचा प्रत्येकी एक सभापती बनला आहे.करवीरमध्ये आमदार पी. एन. पाटील गटाच्या अश्विनी धोत्रे, तर उपसभापतिपदी मंत्री सतेज पाटील गटाचे सुनील पोवार यांची बिनविरोध निवड झाली आहे. आजरा पंचायत समितीमधील सहापैकी पाच सदस्य राष्ट्रवादी कॉँग्रेसचे असतानाही सुरुवातीला कोणाला संधी, यावरून थोडी ताणाताणी झाली; मात्र चर्चेनंतर उदय पोवार (पेरणोली) यांची सभापतिपदी, तर स्वाभिमानीप्रणीत असलेल्या वर्षा बागडी यांची उपसभापती बिनविरोध निवड करण्यात आली. याच निवडीवेळी इतरांनाही आगामी काळात पदे देण्याचे नियोजन करण्यात आले आहे.गडहिंग्लजचे सभापतिपद हे अनुसूचित जातीसाठी आरक्षित असल्याने स्थानिक ताराराणी आघाडीच्या हत्तरकी गटाच्या रूपाली कांबळे या एकमेव सदस्या या पदाच्या दावेदार होत्या. त्यांची आणि उपसभापतिपदी श्रीया कोणेकरी यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.चंदगड पंचायत समितीच्या सभापतिपदासाठी आरक्षित पदासाठी पात्र असलेले भाजपचे गोपाळराव पाटील गटाचे अ‍ॅड. अनंत कांबळे यांची, तर उपसभापतिपदी मनीषा शिवनगेकर यांची निवड झाली आहे. आरक्षणामुळे या ठिकाणी कांबळे यांना पर्यायाने भाजपचा सभापती बनला आहे. कागल पंचायत समितीमध्ये शिवसेनेचे संजय मंडलिक गटाचे विश्वास कुराडे (चिखली) सभापती झाले असून, राष्ट्रवादीचे दीपक सोनार उपसभापती बनले आहेत.भुदरगड पंचायत समितीमध्ये आबिटकर गटाच्या म्हणजेच शिवसेनेच्या विद्यमान उपसभापती कीर्ती देसाई यांना सभापतिपदाची संधी मिळाली आहे, तर सुनील निंबाळकर यांची उपसभापती म्हणून बिनविरोध निवड झाली आहे.राधानगरी पंचायत समितीच्या सभापतिपदी राष्ट्रवादीच्या दीपाली पाटील यांची, तर काँग्रेसचे उत्तम पाटील यांची उपसभापतिपदी बिनविरोध निवड करण्यात आली.

पन्हाळा पंचायत समितीच्या सभापतिपदी अपेक्षेप्रमाणे कोडोलीच्या जनसुराज्यच्या सदस्या गीता प्रमोद पाटील यांची, तर उपसभापतिपदी लक्ष्मी कांबळे यांची बिनविरोध निवड झाली. शाहूवाडी येथे शिवसेनेच्या सुनीता पारळे यांची सभापतिपदी, तर विजय खोत यांची उपसभापतिपदी बिनविरोध निवड करण्यात आली. हातकणंगले पंचायत समितीमध्ये आमदार प्रकाश आवाडे यांच्या ताराराणी आघाडीचे महेश पाटील (चंदूर) यांची, तर उपसभापतिपदी काँग्रेसचे राजकुमार भोसले(नरंदे) यांची बिनविरोध निवड झाली.शिरोळ पंचायत समितीच्या सभापतिपदी काँग्रेसच्या मिनाज जमादार यांची, तर उपसभापतिपदी राजेंद्र पाटील-यड्रावकर गटाचे मल्लू खोत यांची बिनविरोध निवड झाली आहे. गगनबावडा पंचायत समितीच्या सभापतिपदी काँग्रेसच्या संगीता पाटील यांची, तर उपसभापतिपदी पांडुरंग भोसले यांची बिनविरोध निवड करण्यात आली.हातकणंगले येथे भाजप, जनसुराज्यने संघर्ष टाळलाजिल्हा परिषदेच्या निवडणुकीचा परिणाम म्हणून हातकणंगले येथे भाजप आणि जनसुराज्यने संघर्ष टाळला असल्याचे चित्र दिसून येते. या ठिकाणी प्रकाश आवाडे यांनी जोडणी घालत त्यांची ताराराणी आघाडी, शिवसेना, स्वाभिमानी शेतकरी संघटना, अपक्ष आणि काँग्रेसच्या ११ जणांना सहलीवर पाठविले होते. येथे भाजपचे सहा, तर जनसुराज्यचे पाच सदस्य होते; मात्र प्रकाश आवाडे यांनी राज्यात आणि जिल्हा परिषद अध्यक्ष निवडीत भाजपला दिलेल्या पाठिंब्यामुळे या ठिकाणी या दोन्ही पक्षांचे ११ सदस्य सभापती निवडीवेळी गैरहजर राहिले. 

 

टॅग्स :panchayat samitiपंचायत समितीzpजिल्हा परिषदkolhapurकोल्हापूर