कोल्हापूर : जिल्ह्यात सुरू करण्यात आलेल्या महसूल जत्रेअंतर्गत निवडणूक सुरू असलेली गावं वगळता अन्य गावांमधील पाणंद रस्ते वहिवाटीसाठी खुले करण्याची मोहीम घेण्यात आली आहे. याअंतर्गत हडकुळी पाणंद (राधानगरी), नाझरे वसाहत (भुदरगड) दरम्यानचा ७०० मीटर पाणंद रस्ता आणि कसबा कोडोली (ता. पन्हाळा) येथील सराफ रोड पाणंद रस्ता ऊस वाहतुकीसाठी खुला करण्यात आला.सर्व ग्रामस्थांनी सामंजस्याने पाणंद व रस्ते खुले करण्यासाठी तलाठी व मंडळ अधिकारी यांच्याकडे संपर्क साधावा आणि या कामात सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी गुुरुवारी केले. जिल्ह्यात सुुरू असलेल्या महसूल जत्रेअंतर्गत १ हजार २२५ गावांमध्ये किमान एका गावातील अतिक्रमण काढून पाणंद रस्ता वहिवाटीस खुला करण्याचे उद्दिष्ट आहे. यानुसार गावांमधील पाणंद रस्ते ग्रामस्थांच्या सहकार्याने, सर्वसंमतीने आणि सामंजस्याने खुले करण्यात येत आहेत.कसबा वाळवे मंडळातील मौजे माजगाव (ता. राधानगरी) मधील हडकुळी पाणंद रस्ता, तसेच मौजे मानवळे (ता. भुदरगड) येथील भांडेबांबर पैकी नाझरे वसाहत ते सुतार शेत नदीकाठ एकूण सातशे मीटर पाणंद रस्ता ऊस वाहतुकीसाठी खुला केला आहे. पन्हाळा तालुक्यातील कसबा कोडोली येथील सराफ रोड पाणंद रस्ता ऊस वाहतुकीसाठी खुला करून दिला.दुसऱ्या टप्प्यात १५ जानेवारीनंतर उर्वरित गावांमधील अतिक्रमणे काढून पाणंद रस्ते खुले करण्यात येणार आहेत. ग्रामस्थांनी सामंजस्याने आणि सर्वसंमतीने पाणंद व रस्ते खुले करण्यासाठी तलाठी व मंडळ अधिकारी यांच्याकडे संपर्क साधावा आणि या कामात सहकार्य करावे, असे आवाहन करून ग्रामस्थांनी केलेल्या सहकार्याबद्दल त्यांचे आभार जिल्हाधिकारी देसाई यांनी मानले.
महसूल जत्रेअंतर्गत पाणंद व वहिवाटीचे रस्ते खुले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2020 20:24 IST
collector Kolhapur- कोल्हापूर जिल्ह्यात सुरू करण्यात आलेल्या महसूल जत्रेअंतर्गत निवडणूक सुरू असलेली गावं वगळता अन्य गावांमधील पाणंद रस्ते वहिवाटीसाठी खुले करण्याची मोहीम घेण्यात आली आहे. याअंतर्गत हडकुळी पाणंद (राधानगरी), नाझरे वसाहत (भुदरगड) दरम्यानचा ७०० मीटर पाणंद रस्ता आणि कसबा कोडोली (ता. पन्हाळा) येथील सराफ रोड पाणंद रस्ता ऊस वाहतुकीसाठी खुला करण्यात आला.
महसूल जत्रेअंतर्गत पाणंद व वहिवाटीचे रस्ते खुले
ठळक मुद्देमहसूल जत्रेअंतर्गत पाणंद व वहिवाटीचे रस्ते खुले जिल्हाधिकारी दौलत देसाई : ग्रामस्थांना सहकार्याचे आवाहन