यवलूजच्या भैरवनाथ देवस्थानचा पालखी सोहळा यंदाही भाविकांविनाच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 04:38 IST2021-05-05T04:38:52+5:302021-05-05T04:38:52+5:30
या यात्रेला कोल्हापूर जिल्ह्यातील हजारो भाविक उपस्थिती लावतात. मात्र, यंदाही कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे ग्रामपंचायत प्रशासन व कोरोना ग्राम दक्षता ...

यवलूजच्या भैरवनाथ देवस्थानचा पालखी सोहळा यंदाही भाविकांविनाच
या यात्रेला कोल्हापूर जिल्ह्यातील हजारो भाविक उपस्थिती लावतात. मात्र, यंदाही कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे ग्रामपंचायत प्रशासन व कोरोना ग्राम दक्षता समिती यांनी सर्व कार्यक्रम रद्द केल्याने यात्रेला भाविकांना उपस्थित राहता आले नाही. शनिवारी रात्री गावातील मानाची सासनकाठी भैरवनाथ देवाच्या भेटीसाठी नेण्यात आली. त्यानंतर मंदिरामध्ये श्री भैरवनाथ देवाची खडी पूजा बांधून देवाची मोजक्याच गुरव पुजाऱ्यांच्या उपस्थितीत आरती करण्यात आली. दुसऱ्या दिवशी रविवारी सायंकाळी जागृत भैरवनाथ देवाची पालखी गावच्या भैरवनाथ मंदिरात परत आणून देवाची नव्याने आरती करून हा पालखी सोहळा मोजक्याच पुजारी, सेवेकरी यांच्या उपस्थितीत पार पाडण्यात आला. मंदिरात पुजारी म्हणून भिकाजी गुरव, जालिंदर गुरव, प्रणव गुरव, आर्यन गुरव, प्रसाद गुरव यांच्यासह खांदेकरी राहुल जाधव, संभाजी सुतार, संदीप सुतार, सचिन जाधव, अतुल लोहार, तानाजी सुतार उपस्थित होते. यावेळी ग्रामपंचायत प्रशासन, ग्रामविकास अधिकारी जे. बी. चव्हाण, पोलीस पाटील कपिल जाधव, संतोष कोले, केरबा गोसावी, गोविंदा कोले यांच्या मार्गदर्शनाखाली खासगी सुरक्षा कर्मचाऱ्यांनी कडक बंदोबस्त तैनात केला होता.