शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत, माहिम स्थानकात पॉइंट बिघाड; फास्ट ट्रॅकवरील लोकल उशीराने
2
"खाने के लाले, लडने में सबसे आगे...!" रडत-पडत कर्ज मिळवलं अन् संरक्षण बजेट २०% नं वाढवलं; दहशतवाद पोसणाऱ्या PAK चा खरा चेहरा समोर
3
मंत्री संजय राठोडांच्या खात्यात बदल्यांमध्ये प्रचंड अनियमितता, कोट्यवधींचा ‘गेम’, अनेक अधिकारी कार्यकाळ संपल्यानंतरही खुर्चीवरच
4
राजा रघुवंशी हत्याकांडातील आरोपीला पाहताच राग अनावर, प्रवाशाने ऑन कॅमेरा सणसणीत लगावली, VIDEO व्हायरल
5
आजचा अग्रलेख: हे पवार, ते पवार आणि 'पॉवर'
6
एक गेली आता दुसरी आली! श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील संघाला ट्रॉफी जिंकण्याची संधी
7
अवघ्या ९० चेंडूत १९० धावा! वैभव सूर्यवंशीची झंझावती खेळी, मैदानात पाडला षटकारांचा पाऊस
8
शुभांशू शुक्ला यांची अंतराळ मोहीम पुन्हा स्थगित; ऑक्सिजन गळतीमुळे मिशनला लागला ब्रेक
9
जीप-ट्रकची भीषण टक्कर; वधुसह ५ जणांचा जागीच मृत्यू, तर वरासह ८ प्रवासी गंभीर जखमी
10
Unclaimed Bank Deposits : बँकांमध्ये ७८,२१३ कोटी रुपये बेवारस पडून! सरकार प्रत्येक जिल्ह्यात वाटणार पैसे, काय आहे योजना?
11
बॉलिवूड अभिनेत्रीला स्टेज ४ ब्रेस्ट कॅन्सरचं निदान, लेकीला अमेरिकेला पाठवलं; म्हणाली...
12
"हो, मी बाबा होणार आहे...", अरबाज खानने पहिल्यांदाच दिली प्रतिक्रिया; म्हणाला, "नर्व्हस आहेच..."
13
राशीभविष्य, ११ जून २०२५: आर्थिक लाभाची शक्यता, कामात यश मिळेल, प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम कराल!
14
घरातून पळून जाऊन लग्न करणाऱ्या जोडप्यांना दणका, हायकोर्टाच्या आदेशानंतर नियमात बदल!
15
SIP देईल छप्परफाड रिटर्न की RD नं बनाल कोट्यधीश? तुमच्या पैशांचा खरा 'बाहुबली' कोण, जाणून घ्या
16
सोनम रघुवंशीने केलेला 'तो' हट्ट ऐकला नसता, तर कदाचित राजा रघुवंशीचा जीव वाचला असता...
17
तुमच्या स्वप्नातील गाडी महागणार? चीनच्या 'या' निर्णयामुळे ऑटो मार्केटमध्ये खळबळ!
18
भाईजान इज बॅक! सलमान खानने ५९ व्या वर्षी घटवलं वजन, फोटो पाहून चाहतेही अवाक; म्हणाले, "हँडसम..."
19
फ्लॅटची साईज वाढली पण कमी झाला कार्पेट एरिया; घर घेणाऱ्यांना होतंय डबल नुकसान, समजून घ्या
20
Mumbai: उत्पन्नामुळं देशभरात चर्चेत आलेल्या मुंबईतील 'त्या' रिक्षावाल्याच्या पोटावर पाय!

जोतिबा मंदिरात आज पाकाळणी साजरी होणार, यात्रेची जय्यत तयारी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2023 11:57 IST

नवरात्रोत्सवाच्या प्रारंभ आणि चैत्र यात्रेपूर्वी व नंतर अशा तीन पाकाळणी साजरी करून मंदिर स्वच्छ केले जाते

जोतिबा : चैत्र यात्रेच्या पार्श्वभूमीवर जोतिबा मंदिरात पाकाळणी साजरी करून मंदिर स्वच्छ करण्यात येणार आहे. जोतिबा डोंगरावर ५ एप्रिला चैत्र पौर्णिमा यात्रा होणार आहे. यात्रेची जय्यत तयारी सुरू झाली आहे. सोमवारी जोतिबा मंदिराची स्वच्छता करण्यात येणार आहे. स्वच्छ पाण्याचे फवारे मारून मंदिराची स्वच्छता केली जाईल. सकाळी मंदिरात स्थानिक पुजारी, खंडकरी जोतिबा महादेन, नंदी, चोपडाई काळभैरव, यमाई मंदिरातील देवता कृत्य साहित्याची स्वच्छता करतील.अंर्तबाह्य मंदिराची स्वच्छतेला आध्यात्मिक क्षेत्रात पाकाळणी करणे असे म्हणतात. मंदिरात वर्षातून तीन वेळा पाकाळणी साजरी केली जाते. नवरात्रोत्सवाच्या प्रारंभ आणि चैत्र यात्रेपूर्वी व नंतर अशा तीन पाकाळणी साजरी करून मंदिर स्वच्छ केले जाते. दीपमाळ, दगडी कमान, शिखरे, सदर यांच्यावर पाण्याचे फवारे मारले जातात. पालखी, धुपारती सोहळ्याचे साहित्यांची स्वच्छता केली जाते.चैत्र यात्रेची जय्यत तयारी सुरू झाली आहे. मंगळवारपासून मंदिराची रंगरंगोटी केली जाणार आहे. पाकाळणीमुळे मंदिरातील धार्मिक विधी कार्यात बदल होतील. अभिषेक दुपारी १२ नंतर होईल. सकाळी ७ दुपारी १२ पर्यंत मंदिरात स्वच्छता होणार असल्याने दुपारनंतरच भाविकांनी दर्शनास यावे, असे आवाहन देवस्थान समितीचे मंदिर व्यवस्थापक दीपक म्हेत्तर यांनी केले आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरJyotiba Templeजोतिबा