शहरं
Join us  
Trending Stories
1
ISI नं का घडवला मुंबईवर हल्ला?; पाकिस्तानी राष्ट्रपती जरदारीच्या प्रवक्त्याचा मोठा दावा
2
"...तोपर्यंत सरकार तुमच्यासमोर गुडघ्यावर येणार नाही"; कर्जमाफी घेण्यासाठी उद्धव ठाकरेंचा शेतकऱ्यांना सल्ला
3
मारुतीने आज जो इतिहास घडवला, टाटालाही झेपणार नाही; ४२ वर्षांत ३ कोटी कार विकल्या...
4
फक्त २९ पैशांचा शेअर थेट १०० रुपयांवर! १ लाखाच्या गुंतवणुकीतून झाला '३.४४ कोटींचा' नफा
5
जगातील अवघ्या ३ लोकांकडे आहे 'ही' कार! डिझाईन पाहून प्रेमात पडाल अन् किंमत ऐकून हैराण व्हाल!
6
१७ वर्षे एकाच कंपनीत काम केले, अचानक काढून टाकले, कर्मचाऱ्याने लाखमोलाचा दिला सल्ला, पोस्ट व्हायरल
7
मोदी सरकारचा मोठा निर्णय; ऑपरेशन सिंदूरनंतर पहिल्यांदाच पाकिस्तानात गेले 2100 भारतीय, कारण काय?
8
भाजी विक्रेत्याने जिंकली तब्बल ११ कोटींची लॉटरी; टॅक्स भरून हातात किती पैसे येणार?
9
चेज मास्टर विराट कोहलीचे व्यवसायिक साम्राज्य माहितीये का? क्रिकेटपेक्षा इथून करतो सर्वाधिक कमाई
10
Student Death: स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या सागरने आईच्या साडीनेच संपवले आयुष्य; एका तरुणीमुळे...
11
गुगल क्रोम वापरणाऱ्यांना मोठा धोका; हॅकर्सचं लक्ष तुमच्यावरच! सुरक्षित राहण्यासाठी 'ही' गोष्ट आताच करा
12
Shocking: गंमत म्हणून विवाहित महिलेनं डीएनए चाचणी केली, सासराच निघाला बाप!
13
देव तारी त्याला कोण मारी! भीषण रेल्वे अपघातात ढिगाऱ्याजवळ जिवंत सापडला चिमुकला, पण...
14
भाजपाची महिला पदाधिकारी, नेत्यांना पुरवायची मुली; बिहार निवडणुकीत वरिष्ठांनी दिली जबाबदारी
15
श्रीदेवीचा सुपरहिट सिनेमा 'मॉम'च्या सीक्वेलमध्ये दिसणार 'ही' अभिनेत्री, सेटवरील फोटो लीक
16
लाडकी बहीण अन् काय काय...! वर्षात १२ राज्यांनी महिलांना वाटले तब्बल १.६८ लाख कोटी रुपये
17
तो, ती आणि प्रेमाची बहार! पांड्यानं शेअर केला गर्लफ्रेंडसोबतचा खास व्हिडिओ
18
क्या बात! रितेश देशमुखच्या आईसाहेबांनी बल्बच्या प्रकाशात घेतलं ड्रॅगन फ्रूटचं पीक; सूनबाईंना कौतुक, शेअर केला व्हिडीओ
19
सोनाराच्या दुकानात ४ वर्ष काम केलं, रोज थोडं थोडं करून २.५ कोटींचं सोनं गायब केलं! कशी पकडली गेली चोरी?
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

पाकची साखर मुंबईत : तीस हजार क्विंटलची आयात- साखरेचे दर गडगडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2018 22:36 IST

राजाराम लोंढे ।कोल्हापूर : ठरावीक वस्तूंची निर्यात केल्यानंतर त्या बदल्यात काही प्रमाणात कोणतीही वस्तू विनाशुल्क आयात करण्याला मुभा देण्याचे केंद्र सरकारचे धोरण आहे. या धोरणाचाच फायदा मुंबईतील एका बड्या कंपनीने उठविला आहे.या कंपनीने पाकिस्तानला चॉकलेट निर्यात केले. त्या बदल्यात चॉकलेटमधील साखरेएवढीच म्हणजे ३० हजार क्विंटल साखर विनाशुल्क आयात केली आहे. ...

ठळक मुद्देनिर्यातीच्या बदल्यात कोणतीही वस्तू विनाशुल्क आयातीला मुभा देण्याच्या धोरणाचा एका बड्या कंपनीने उठविला फायदा

राजाराम लोंढे ।कोल्हापूर : ठरावीक वस्तूंची निर्यात केल्यानंतर त्या बदल्यात काही प्रमाणात कोणतीही वस्तू विनाशुल्क आयात करण्याला मुभा देण्याचे केंद्र सरकारचे धोरण आहे. या धोरणाचाच फायदा मुंबईतील एका बड्या कंपनीने उठविला आहे.

या कंपनीने पाकिस्तानला चॉकलेट निर्यात केले. त्या बदल्यात चॉकलेटमधील साखरेएवढीच म्हणजे ३० हजार क्विंटल साखर विनाशुल्क आयात केली आहे. पनवेल आणि वाशी येथील गोदामामध्ये ती ठेवण्यात आली असल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले. याचा परिणाम म्हणून साखरेचे दर गडगडले आहेत. साखर उद्योगाच्या अडचणीतही वाढ झाली आहे.

देशात ३१६ लाख टन यंदा साखरेचे उत्पादन, तर गेले वर्षीचे ४० लाख टन साखर शिल्लक आहे. त्यात आंतरराष्टÑीय बाजारपेठेत साखरेला मागणी नसल्याने उठाव होत नाही. परिणाम देशांतर्गत बाजारपेठ कमालीची घसरल्याने साखर उद्योग अडचणीत आहे. एफआरपीप्रमाणे पैसे देण्यासाठी कारखान्यांकडे पैसे नाहीत. शेतकरी, साखर कारखानदारांच्या रेट्यानंतर केंद्राने निर्यात अनुदानाची घोषणा करीत आयातशुल्क वाढविले. त्यामुळे बाजारातील साखरेचे दर स्थिर होतील, अशी अपेक्षा असतानाच पाकिस्तानची साखर आयात झाल्याने साखर उद्योग क्षेत्रात खळबळ उडाली आहे.

विशेष म्हणजे पाकिस्तानच्या साखरेचे दर स्थानिक साखरेपेक्षा एक रुपयांनी कमी आहेत.परिणामी स्थानिक साखरेला फटका बसत असून, आधीच दरात घसरण झाली असताना त्यात हे संकट उभे राहिल्याने साखरउद्योग तग धरणार का? याविषयीची चिंता व्यक्तकेली जात आहे.घाऊक बाजारात साखर २४२० रुपयेसाखरेच्या दरातील घसरण थांबण्याचे नाव घेत नाही. कारखान्यांमध्ये साखरेची गोडावून फुल्ल आहेत आणि मागणी नाही. त्यामुळे सध्या बाजारात प्रतिक्विंटल २४२० रुपयांपर्यंत दर पोहोचला आहे.सहा महिने ‘रेक’ मोकळीच  कोल्हापुरातून रोज २६०० टन साखर रेक (रेल्वे) मधून पंजाब, पश्चिम बंगाल, गुवाहाटी, आदी राज्यांत जात होती; पण गेले सहा महिन्यांपासून एकही रेक जाऊ शकलेली नाही. त्यामुळे व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. 

आयात शुल्कात पळवाट काढून अशा प्रकारे साखर देशात आल्याने साखर उद्योगाचे मोठे नुकसान झाले आहे. केंद्र सरकारने गांभीर्याने लक्ष देऊन आयातीबाबत कडक पावले उचलली नाहीतर हा उद्योग उद्ध्वस्त होईलच, पण शेतकरीही देशोधडीला लागेल.- पी. जी. मेढे, तज्ज्ञ, साखर उद्योग

टॅग्स :Sugar factoryसाखर कारखानेkolhapurकोल्हापूर