‘लोकमत बालविकास मंच’तर्फे चित्रकला, निबंध स्पर्धा
By Admin | Updated: February 26, 2015 00:06 IST2015-02-26T00:01:00+5:302015-02-26T00:06:30+5:30
‘माझ्या स्वप्नातील घर’ विषय : स्पर्धा सर्व विद्यार्थ्यांसाठी खुली

‘लोकमत बालविकास मंच’तर्फे चित्रकला, निबंध स्पर्धा
कोल्हापूर : ‘लोकमत बालविकास मंच’तर्फे ‘माझ्या स्वप्नातील घर’ या विषयावर चित्रकला व निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा सर्व विद्यार्थ्यांसाठी खुली आहे. चित्रकला स्पर्धा शनिवारी (दि. २८) दुपारी साडेचार ते साडेपाच या वेळेत होईल. निबंध स्पर्धा १ मार्च रोजी सकाळी ११ ते दुपारी १२ या वेळेत होईल. या दोन्ही स्पर्धा हॉटेल पॅव्हेलियनच्या मधुसूदन हॉलमध्ये होतील. स्पर्धकांनी चित्रांसाठी लागणारे रंग, साहित्य, पाण्याची बाटली आणि बसण्यासाठी छोटी चटई सोबत आणावी. ड्रॉइंग पेपर ‘लोकमत’तर्फे देण्यात येईल.
निबंध लेखनासाठी लागणारे लेखनसाहित्य विद्यार्थ्यांनी स्वत: आणावे, आखीव पेपर ‘लोकमत’च्यावतीने दिला जाईल. या दोन्ही इयत्ता पहिली ते तिसरी, चौथी ते सहावी, सातवी ते दहावी अशा तीन वयोगटांत होणार आहे. प्रथम क्रमांक विजेत्यांना चांदीचे नाणे, जॅक अॅँड जिलच्यावतीने चारशे रुपयांचे गिफ्ट व्हाउचर, गीताश केक्स अॅँड चॉकलेटच्यावतीने १८० रुपयांचे गिफ्ट व्हाुचर, प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह दिले जाईल. द्वितीय व तृतीय क्रमांक विजेत्यांना जॅक अॅँड जिलतर्फे तीनशे व दोनशे रुपयांचे गिफ्ट व्हाउचर, गीताशतर्फे १३५ व शंभर रुपयांचे गिफ्ट व्हाउचर व प्रमाणपत्र दिले जाईल.
स्पर्धेत सहभागी होण्यासाठी पूर्वनोंदणी आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी लोकमत कार्यालय, पूर्णिमा अपार्टमेंट, कोंडा ओळ, लक्ष्मीपुरी; दूरध्वनी क्रमांक ०२३१-६४१७०७, ०८, ०९ येथे किंवा नितीन ७७९८३४४७४४ यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.