तीन दिवसांच्या संपानंतर शुक्रवारी शासकीय कार्यालये गजबजली; तर शाळांचा परिसरही फुलून गेला. आपल्या विविध मागण्यांसाठी सरकारी कर्मचाऱ्यांनी तीन दिवसांचा संप पुकारल्याने शासकीय कार्यालये आणि शाळा ओस पडल्या होत्या. ...
कोल्हापूर शहराच्या निम्म्याहून अधिक भागाला पाणी पुरवठा करणाऱ्या बालिंगा जलशुद्धीकरण केंद्रातील ट्रान्स्फॉर्मस शुक्रवारी पुन्हा एकदा बिघडल्याने पाणी पुरवठा बंद ठेवण्याची नामुष्की महापालिका प्रशासनावर ओढवली. गेल्याच आठवड्यात एकाच रात्री तीनवेळा वीज पुर ...
कोल्हापूर शहरात वारंवार विस्कळीत पाणीपुरवठा होत असल्याबद्दल शुक्रवारी झालेल्या महानगरपालिकेच्या स्थायी समितीच्या सभेत तीव्र नाराजी व्यक्त करीत सदस्यांनी अधिकाऱ्यांना झापले. ‘काय करायचे ते एकदाच करा; पण नागरिकांना व्यवस्थित पाणी पाजा,’ अशा शब्दांत अधि ...
स्वातंत्र्यदिनी प्लास्टिकच्या राष्ट्रध्वजाच्या वापरावर शासनाने बंदी घातली आहे. राष्ट्रध्वजाचा योग्य तो मान राखला जावा, तसेच त्याचा अवमान होऊ नये, याची सर्वांनी दक्षता घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांनी केले आहे. ...
येथील धनाजी गाडगीळ खूनप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेला पैलवान अक्षय जयसिंग कोंडेकर (वय २३, रा. भैरवनाथ मंदिराजवळ, पाचगाव) याचा शुक्रवारी सीपीआर रुग्णालयात उपचारावेळी मृत्यू झाला. त्याच्या शरीरातील ...
केंद्र सरकारने सन २०२२ पर्यंत सर्वांना प्रधानमंत्री आवास योजनेतून घरे देण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. या पार्श्वभूमीवर जयसिंगपूर शहरातील घरांच्या मागणीबाबत पालिकेने सर्वेक्षण सुरू केले आहे. चार घटकांतर्गत या घरकुलांचा लाभ लाभार्थ्यांना मिळणार आहे. ...
महानगरपालिकेजवळ असणाऱ्या, जिल्हा परिषदेच्या ११ गुंठे जागेवर पाच मजली ‘कमर्शिअल कॉम्प्लेक्स’ उभारण्याचा प्रस्ताव जिल्हा परिषदेने तयार केला आहे. आठ कोटी रुपये खर्चाचा हा प्रकल्प वास्तवात आल्यास जिल्हा परिषदेला उत्पन्नासाठी एक चांगला ...
कोल्हापूर : कडकडीत बंद कसा असावा याचा इतिहासात एक मानदंड ठरावा, असा कोल्हापूरकरांनी गुरुवारी अभूतपूर्व बंद पाळला. नोकरी आणि शिक्षणात आरक्षण मिळालेच पाहिजे या मागणीसाठी अवघा मराठा बंदच्या निमित्ताने रस्त्यावर उतरल्याने शहरातील सगळे रस्ते भगव्या जनसागर ...
चार वर्षे उलटूनही सरकार आरक्षणाबाबत सकारात्मक नाही. त्यामुळे आमचा संयम आता संपत चालला आहे. केंद्रात व राज्यात तुमचे सरकार असल्याने घटनेत दुरुस्ती करा व लवकरात लवकर आरक्षण द्या, ...