यंदा कोयता आणि मशीन यांचा एकाचवेळी रपाटा सुरू झाल्याने साखर कारखान्याच्या गाळपाचा वेग वाढला आहे. कारखाने सुरू झाल्याच्या १५ ते २0 दिवसांंतच २५ टक्के क्षेत्रावरील तब्बल २0 लाख मेट्रीक टन उसाची तोडणी पूर्ण झाली आहे. ...
शेतकऱ्यांना देशोधडीला लावणाºया सरकारला धडा शिकवण्यासाठी २४ डिसेंबरला पुणे-बंगलोर महामार्गावर चक्का जाम आंदोलन करणार असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य इरिगेशन फेडरेशनचे अध्यक्ष, ज्येष्ठ नेते प्रा. डॉ. एन. डी. पाटील यांनी दिली. ...
कोल्हापूर : चित्रपटसृष्टीचीच नव्हे तर कोल्हापूरकरांची अस्मिता असलेल्या शालिनी सिनेटोनची आरक्षित जागा शासनातील कारभारी मंत्री व महापालिकेच्या भ्रष्ट अधिकाऱ्यांनी ... ...
हुपरी (ता. हातकणंगले) येथील गट क्रमांक ९२५/८अ १ या सरकारी हक्कातील ७ हेक्टर जमिनीचे भूखंड पाडून, ती बेघर कुटुंबांना रहिवासी वापरासाठी मिळावी, यासह विविध मागण्यांसाठी बेघर कुटुंबांनी राणी इंदुमतीदेवी बेघर संघटनेच्या माध्यमातून जिल्हाधिकारी कार्यालयासम ...
यावर्षी दहावीच्या विद्यार्थ्यांची कलमापन चाचणी मोबाईलवर घेतली जाणार आहे. त्याबाबत कोल्हापूर आणि कोकण विभागांतील तालुकापातळीवरील प्रत्येक दोन शिक्षकांना शुक्रवारी कोल्हापुरात मार्गदर्शन करण्यात आले. यानंतर आता तालुका आणि शाळापातळीवर शिक्षकांना या चाचण ...
एन.सी.सी.च्या वायुसेना विभागातील विद्यार्थ्यांना विमान चालविण्याचे प्रशिक्षण देणे आवश्यक असून, सध्या हे प्रशिक्षण देण्यासाठी स्वतंत्र केंद्र नाही. कोल्हापूरमधील उजळाईवाडी येथील विमानतळावर वायू विभागात असणाऱ्या छात्रांसाठी विमान चालविण्याचे प्रशिक्षण ...
गुळाच्या दरात सातत्याने घसरण सुरू झाल्याने गूळ उत्पादक अडचणीत आला आहे. सध्या गुळाला सरासरी प्रतिक्विंटल ३००० ते ३४०० रुपये दर मिळत आहे. उत्पादन खर्च वाढल्याने या दरामुळे फायदा राहू दे, उलट तोटाच पदरात पडत असल्याने गूळ उत्पादक आतबट्ट्यात आले आहेत. ...
जनावरांसाठी लाळखुरकतची लस टोचून घेण्यास नकार देणे पशुपालकांना चांगलेच महागात पडले आहे. लस न दिल्याने गेल्या पंधरा दिवसांत जवळपास १३ जनावरे दगावली असल्याचे समोर आले आहे. शासनाकडून कोणताही लाभ मिळत नसल्याने पशुपालकांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. या ल ...