राष्ट्रवादी काँग्रेसमधील दिवसभरातील नाट्यपूर्ण घडामोडींनंतर कोल्हापूरच्या महापौरपदी माधवी प्रकाश गवंडी यांची बिनविरोध निवड झाली. विरोधातील भाजप-ताराराणी आघाडीने त्यांना हवा तो उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेसने दिल्याने ही निवडणूक लढविली नाही. ...
पुण्यातील व्यावसायिक विनोद रमाकांत जोशी (वय ५९, रा. पिरंगुट, ता. मुळशी, जि. पुणे) यांनी पत्नी मीना जोशी (५५) यांच्यासह विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली. ...
सासरी आलेल्या आई-वडिलांवर चोरीचा आळ घेतल्याचा धक्का सहन न झाल्याने निलंबित पोलीस हवालदाराच्या पत्नीने घराच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी घेत आत्महत्येचा प्रयत्न केला. ...
गोंधळी, जोशी, वासुदेव व बागडी समाजाची जातनिहाय जनगणना करावी,यासह विविध मागण्यांसाठी कोल्हापूर जिल्हा गोंधळी, जोशी, वासुदेव, बागडी समाज मंडळातर्फे शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण करण्यात आले. यावेळी आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी करत ...
कोल्हापूर विभागातील १८२३ प्राध्यापकांची सातव्या वेतन आयोगानुसार वेतननिश्चितीची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. उर्वरित ६२२ प्राध्यापकांच्या कागदपत्रांच्या तपासणीचे काम सध्या सुरू आहे. वेतननिश्चितीसाठी पैशांची मागणी होत असल्याची एकही लेखी तक्रार माझ्याकडे आ ...
कोल्हापूर शहरात रस्त्यांवर मोकाट व भटक्या जनावरांविरोधात महापालिकेने मोहीम सुरू केली आहे. गुरुवारी दिवसभरात या पथकामार्फत ताराबाई पार्क, राजारामपुरी, भवानी मंडप, शिवाजी चौक या परिसरांत विशेष मोहीम राबविली. त्यामध्ये सहा मोकाट गाई पकडून त्यांच्या मालक ...
यादव गवळी समाज शेती व पशुपालन करून उदरनिर्वाह करणारा असल्याने शासनाच्या अनेक सुविधा समाजापर्यंत पोहोचलेल्या नाहीत. हा समाज भटक्या-विमुक्त जमाती एन. टी. (बी)मध्ये समाविष्ट आहे. त्याला जातीचा दाखला काढण्यासाठी अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. त्यामधील ...
कोल्हापूर येथील संजय कात्रे लिखित व दिग्दर्शित ‘ट्रॅफिक ट्रॅफिक’ या एकांकिकेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना वाहतूक शिस्तीचे धडे मिळाले. न्यू एज्युकेशन सोसायटीतर्फे स. म. लोहिया व पद्माराजे हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी हा प्रयोग आ ...