उत्तरप्रदेशकडे 1 हजार 456 मजूर श्रमिक विशेष रेल्वेने आज दुपारी 1 वाजता कोल्हापुरातून रवाना झाले. भारत माता की जय ! छत्रपती शाहू महाराज की जय ! चा नारा देत या मजुरांना सर्वांनी शुभेच्छा दिल्या. ...
कोल्हापूर : येथील कदमवाडीमधील डॉ. डी.वाय.पाटील रुग्णालयात कोव्हिड-19 तपासणी लॅब कार्यान्वित करण्यात आली आहे. जिल्ह्यातील ही तीसरी कोव्हिड-19 तपासणी ... ...
शेत, घर, जमीनवाटणीच्या वादातून सातजणांनी नंग्या तलवारी नाचवत तरुणांसह दोघांना लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करण्याचा प्रकार करवीर तालुक्यातील पाचगाव येथे घडला. या प्रकाराची नोंद करवीर पोलीस ठाण्यात झाली. ...
उत्तरप्रदेशला रेल्वे असल्याच्या गैरसमजातून शिरोली येथील हजारो मजूर गुरुवारी मुलाबाळांसह भर उन्हात कोल्हापुरातील रेल्वेस्थानकाच्या दिशेने चालत जात होते. यावेळी पोलिसांनी त्यांना तावडे हॉटेल, पुलाच्या परिसरातच बॅरेकड्स लावून अडविले. ...
कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकजण आपापल्या परीने प्रयत्न करीत आहे. सांगरूळ (ता. करवीर) येथील चंद्रकांत जंगम यांनी अकरा फुटी पैलवान तयार करून त्याच्या माध्यमातून ते कोरोनाविरुद्धच्या आखाड्यात उतरले आहेत. गल्लोगल्ली जाऊन त्यांनी प्रबोधन सुर ...
कोरोना विषाणूमुळे बंद असलेले उद्योग पुन्हा सुरू झाल्याने रिकाम्या हातांना काम मिळाल्याने परराज्यांतील कामगार पुन्हा स्थिरावत आहेत. एकीकडे परराज्यांतील कामगार गावी जात असताना काही परराज्यांतील कामगारांनी या ठिकाणी राहण्याचा निर्णय घेतल्याचे पाहावयास म ...
कोल्हापुरातील उद्योगांचे चक्र सुरू झाले असून काहीही करून गावी जाणाऱ्या परप्रांतीय कामगारांना थांबवा, अशी विनंती कोल्हापूर जिल्ह्यातील विविध नऊ औद्योगिक संघटनांच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्याकडे केली. ...
कोल्हापूर जिल्ह्यातील नागरिकांच्या घसा आणि नाकातील स्राव घेण्यासाठीची केंद्रे वाढविल्यामुळे आजपर्यंत सर्वाधिक म्हणजे १२२८ नागरिकांचे स्राव एका दिवसात घेण्यात आले. दिवसभरामध्ये १५९२ नागरिकांची तपासणी करण्यात आली; तर ११६१ अहवाल प्रलंबित आहेत. ...
छत्रपती संभाजीराजे यांच्या ३६३व्या जयंतीनिमित्त शिवशक्ती प्रतिष्ठानतर्फे गुरुवारी कोल्हापुरातील रुईकर कॉलनी येथील छत्रपती संभाजी महाराज उद्यानातील संभाजी महाराजांच्या पुतळ्यास दुग्धाभिषेक घालून अभिवादन करण्यात आले. ...
नव्याने आढळून आलेल्या रुग्णांमुळे राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या आता 981 वर पोहोचली असून काल बुधवारी सायंकाळपासून आज गुरुवार दुपारपर्यंत राज्यात 22 नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. ...