कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेवेळी ठिय्या आंदोलन करणाऱ्या विरोधी पक्षाच्या सदस्यांपैकी तिघेजण पॉझिटिव्ह आल्यामुळे इतरांवर क्वारंटाईन होण्याची वेळ आली आहे. ...
कोरोनाच्या गंभीर रुग्णांना जीवनदायी ठरणारे रेमडेसिविर इंजेक्शन्स घेण्यासाठी जिल्हा परिषदेत गर्दी वाढली आहे. आतापर्यंत २६४१ इंजेक्शनचे वाटप झाले आहे. बुधवारी रांगा लावून हे इंजेक्शन घेतले. ...
कोरोना रुग्णांसाठी ऑक्सिजनची तत्काळ सोय उपलब्ध व्हावी यासाठी सीपीआर रुग्णालयामध्ये बसविण्यात आलेला २० हजार लिटरचा लिक्विड ऑक्सिजन टँक मंगळवारपासून कार्यान्वित करण्यात आला. ...
कोरोनाचे रुग्ण सातत्याने वाढत असल्यामुळे शहरातील खासगी तसेच विश्वस्त रुग्णालयांनी अतिरिक्त वैद्यकीय सुविधा एक आठवड्यात वाढवाव्यात, असे सक्त आदेश जिल्हाधिकारी दौलत देसाई व महापालिका आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी संबंधित ३७ रुग्णालयांना बजावले. ...
कोल्हापूर महानगरपालिकेच्या घरफाळा घोटाळ्याप्रकरणी ५०० प्रकरणांची छाननी केली जाणार असून, त्याकरिता आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी मंगळवारी दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांची नियुक्ती केली. ...
सोनियाच्या पावलांनी गवर आली माहेराला... गवर आली माहेराला भाजी-भाकर जेवायला, भाजी भाकर जेवली, रानोमाळ हिंडली... पानाफुलांनी बहरली... अशा या पानाफुलांनी बहरलेल्या गौराईचे मंगळवारी घरोघरी आगमन झाले. लेक गणपतीच्या शेजारी गौराईची प्रतिष्ठापना करण्यात आली. ...
शिवाजी विद्यापीठाच्या सन २०२०-२१ या शैक्षणिक वर्षातील एम.ए., एम.कॉम. व एलएल.एम. भाग एक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज भरण्याची मुदत दि. ५ सप्टेंबरपर्यंत वाढविण्यात आली आहे. ...
जनतेच्या हाकेला धावून जाणारा माणूस अशी ओळख प्रस्थापित केलेले बाजारभोगांवचे सरपंच नितीन शामराव पाटील (वय ४७)यांचे मंगळवारी पहाटे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या अशा अकाली जाण्याचा पंचक्रोशीला धक्का बसला. ...