यादव प्रतिष्ठानच्या वतीने गरजूंना जेवणांची पाकिटे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2021 04:23 IST2021-05-24T04:23:15+5:302021-05-24T04:23:15+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क, पेठवडगाव : स्व. विजयसिंह यादव यांच्या सामाजिक कार्याचा वारसा पोळ दाम्पत्यानी सक्षमपणे सांभाळला आहे. तसेच ...

Packets of food to the needy on behalf of Yadav Pratishthan | यादव प्रतिष्ठानच्या वतीने गरजूंना जेवणांची पाकिटे

यादव प्रतिष्ठानच्या वतीने गरजूंना जेवणांची पाकिटे

लोकमत न्यूज नेटवर्क, पेठवडगाव : स्व. विजयसिंह यादव यांच्या सामाजिक कार्याचा वारसा पोळ दाम्पत्यानी सक्षमपणे सांभाळला आहे. तसेच एक घास आपुलकीचा माध्यमातून गरजूंना आधार मिळणार आहे. लॉकडाऊनमुळे अनेकांच्या उपजीविकेचा प्रश्न निर्माण झाला असून अशा उपक्रमासाठी सामाजिक संस्थांनी पुढे आले पाहिजे, असे आवाहन आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी केले.

येथील पालिका चौकात विजयसिंह यादव प्रतिष्ठानच्या वतीने गरजूंसाठी जेवणांची पाकीट देण्याच्या कामाचा प्रारंभ राज्यमंत्री पाटील यांच्या हस्ते झाला. यावेळी माजी पोलीस आयुक्त गुलाबराव पोळ, माजी आमदार डॉ. सुजित मिणचेकर, जिल्हा परिषदेचे अर्थ व शिक्षण सभापती प्रवीण यादव, हंबीरराव पाटील, माजी नगराध्यक्षा विद्या पोळ, डाॅ. अशोक चौगुले आदी प्रमुख उपस्थित होते.

विद्या पोळ म्हणाल्या, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन झाल्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. यांचा सामान्यांना फटका बसत आहे. यासाठी मदतीचा हात म्हणून हा उपक्रम राबवित आहोत.

प्रास्ताविक सचिन पाटील यांनी, तर अभिजित गायकवाड यांनी आभार मानले. यावेळी माजी उपनराध्यक्ष आनंदा म्हेत्रस, अमोल हुक्केरी, नितीन दिंडे, काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन चव्हाण,

प्राचार्य प्रदीप पाटील, प्रवीण पाटील, मिणचे उपसरपंच अभिनंदन शिखरे, भाजपा शहराध्यक्ष जगन्नाथ माने, शशिकांत पिसे आदी उपस्थित होते.

फोटो कॅप्शन - पेठवडगाव : येथील विजयसिंह यादव प्रतिष्ठानच्या वतीने मोफत जेवणाची पाकीट सेवेचा शुभारंभ करताना राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर,डॉ. सुजित मिणचेकर, विद्या पोळ, गुलाबराव पोळ, प्रवीण यादव, अभिजित गायकवाड आदी मान्यवर. (छाया : संतोष माळवदे, वडगाव)

Web Title: Packets of food to the needy on behalf of Yadav Pratishthan