शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

Mahashivratri: शिवशंकराचे दर्शन देणारी कोल्हापूरच्या पी. सरदारांची कॅलेंडर चित्रे लक्षवेधी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2025 15:47 IST

चिंतनातून महाशिवरात्रीची चित्रे

कोल्हापूर : महाशिवरात्रीनिमित्त चित्रनिर्मितीतून भारतीय संस्कृतीचे दर्शन घडवणारी चित्रकार पी. सरदार यांची शिवशंकराची कॅलेंडर चित्रांची संपदा आजही लक्षवेधी आहे.हातकणंगले येथे मुस्लिम धर्मात जन्मलेले पी. सरदार म्हणजेच सरदार महंमद पटेल यांना कलानगरीतील चित्रकार आणि कॅलेंडर चित्रांचे बादशाह म्हटले जाते. कोल्हापूरच्या अभिजात आणि वास्तववादी चित्रपरंपरेत त्यांनी भर घातली आहे.जगातले सर्वच धर्म दया, क्षमा आणि शांतीचा संदेश देतात असा संदेश ते आपल्या चित्रातून व्यक्त करत आले आहेत. त्यांनी निर्माण केलेल्या अनेक जाती धर्माच्या, देव-देवतांच्या चित्रांच्या कॅलेंडर स्वरूपातील लाखो प्रति काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत घराघरात पोहोचल्या आहेत. सबका मालिक एक असा संदेश देणाऱ्या कॅलेंडर चित्रातून ते प्रसिद्ध झाले. त्यानंतर त्यांनी तयार केलेल्या हजारो कॅलेंडर चित्रांनी त्यांना लोकप्रियता मिळवून दिली.चिंतनातून महाशिवरात्रीची चित्रेमहाशिवरात्रीच्या निमित्ताने कॅलेंडर स्वरूपात देशभरातील विविध मंदिरात, घरात शिवशंकराची त्यांनी काढलेली चित्रे आजही दिसून येतात. ही चित्रे काढताना सरदार यांनी ध्यान, उपवास आणि चिंतन केले आहे. पार्वतीचा विवाह सोहळा, शंकराची विविध रूपे, समुद्रमंथनाने शंकराचे झालेले निळे क्षार रूपदर्शन, कैलास पर्वतावरील वास्तव्य, तसेच गणपती आणि नंदी शंकराच्या पिंडीची अभिषेक घालून पूजा करतात हे चित्र तर खूपच लोकप्रिय आहे.

हे जनप्रिय चित्रकार आज हयात नाहीत; पण त्यांच्या कलाकृतीतील अध्यात्माचे अधिष्ठान आजही स्मरण करून देते. त्यांच्या पश्चात मुलगा दारा आणि हरून, मुलगी शबनम स्वतंत्र चित्रनिर्मिती करतात. वडिलांच्या स्मरणार्थ त्यांनी कोल्हापुरातच सुरू केलेल्या पी आर्ट गॅलरीत त्यांच्या देवदेवतांच्या विविध रूपातील चित्रसंपदा प्रत्यक्ष पाहावयास मिळतात. - प्रशांत जाधव, चित्रकार

टॅग्स :kolhapurकोल्हापूरMahashivratriमहाशिवरात्री