पी. एन. पाटील यांना शुभेच्छांसाठी फोन खणखणले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:20 IST2021-01-08T05:20:21+5:302021-01-08T05:20:21+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष, आमदार पी. एन. पाटील यांना उपमुख्यमंत्री अजित पवार, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज ...

P. N. The phone rang to wish Patil well | पी. एन. पाटील यांना शुभेच्छांसाठी फोन खणखणले

पी. एन. पाटील यांना शुभेच्छांसाठी फोन खणखणले

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष, आमदार पी. एन. पाटील यांना उपमुख्यमंत्री अजित पवार, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह मंत्री, आमदार, खासदार यांनी बुधवारी फोनद्वारे शुभेच्छा दिल्या. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय आमदार पाटील यांनी घेतला होता. त्यामुळे एरव्ही वाढदिवसानिमित्त शुभेच्छांच्या गराड्यात असणारे आमदार पाटील यांनी फोनद्वारेच नेते व कार्यकर्त्यांच्या शुभेच्छा स्वीकारल्या. बुधवारी सकाळपासूनच शुभेच्छांसाठी त्यांचे फोन खणखणत होते. शाहू छत्रपती, उपमुख्यमंत्री अजित पवार, बांधकाम मंत्री अशोकराव चव्हाण, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, पालकमंत्री सतेज पाटील, ‘नाबार्ड’चे माजी अध्यक्ष यशवंतराव थोरात, आमदार प्रकाश आवाडे, माजी खासदार कल्लाप्पाण्णा आवाडे, आमदार प्रा. जयंत आसगावकर, माजी खासदार जयवंतराव आवळे, आमदार राजू आवळे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील, माजी आमदार के. पी. पाटील, उद्योगपती व्ही. बी. पाटील यांच्यासह जिल्हा बँक, ‘गोकुळ’, भोगावती साखर कारखाना, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य आदींनी फोनद्वारे शुभेच्छा दिल्या.

Web Title: P. N. The phone rang to wish Patil well