शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

पी. एन. पाटीलांची ‘भोगावती कारखान्या'च्या रिंगणातून माघार, राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2023 12:05 IST

सडोलीतून उमेदवार कोण?

कोल्हापूर : परिते (ता. करवीर) येथील भोगावती सहकारी साखर कारखान्यासाठी कारखान्याचे विद्यमान अध्यक्ष, आमदार पी. एन. पाटील यांच्यासह त्यांच्या कुटुंबातील एकानेही अर्ज दाखल केलेला नाही. कारखान्याच्या स्थापनेपासून त्यांच्या कुटुंबातील एक व्यक्ती सातत्याने कारखान्यात राहिली आहे. महाराष्ट्राच्या सहकारी साखर कारखानदारीच्या इतिहासात विद्यमान अध्यक्षांनीच रिंगणातून बाजूला होणे, ही दुर्मिळ घटना असावी.‘भोगावती’ कारखान्याच्या स्थापनेपासून आमदार पी. एन. पाटील यांच्या घराण्यातील व्यक्ती कारखान्याच्या राजकारणात सक्रिय आहे. १९९४ पासून २०१२ च्या निवडणुकीचा अपवाद वगळता कारखान्याचे नेतृत्व आमदार पाटील यांच्याकडे होते. मागील निवडणुकीत कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर आमदार पाटील हे स्वत: रिंगणात उतरले आणि अध्यक्ष झाले.त्यांनी गेल्या पाच वर्षांत कारखान्याची विस्कटलेली घडी पूर्वपदावर आणण्याचा कसोशीने प्रयत्न केला. कारखान्यात आर्थिक शिस्त लावत शेतकऱ्यांच्या ऊस बिलासह ऊस तोडणी व ओढणीची बिलेही त्यांनी अदा केली आहेत. त्यामुळे यावेळेला त्यांच्या नेतृत्वाखालीच सत्तारुढ गट निवडणुकीला सामोरे जाईल, असे सभासदांना वाटत होते. कारखान्याच्या हितासाठी निवडणूक बिनविरोध करण्याचे आवाहन त्यांनी संबंधित घटकांना केले आहे. विरोधकांकडूनही त्याला सकारात्मक प्रतिसाद मिळत असताना, आमदार पाटील यांनी उमेदवारी अर्जच दाखल न करणे हे त्यांच्या कार्यकर्त्यांच्या दृष्टीने धक्कादायक मानले जात आहे.शिष्टमंडळाकडून उमेदवारीसाठी आग्रहमंगळवारी अर्ज दाखल करण्याचा अखेरचा दिवस होता. त्यामुळे सोमवारी काँग्रेसच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी आमदार पाटील यांची भेट घेऊन उमेदवारी अर्ज दाखल करण्याबाबत आग्रह धरला. तुम्ही नाहीतर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राहुल पाटील यांचा तरी अर्ज भरा, अशी विनंती केली, मात्र त्यांनी स्पष्ट शब्दात नकार दिला.

सडोलीतून उमेदवार कोण?सडोली खालसा गावातून आमदार पाटील यांच्या गटाच्या एकाही इच्छुकाने अर्ज दाखल केलेला नाही. ‘शेकाप’चे अशोकराव पवार, त्यांचे बंधू रामदास पवार व सुपुत्र अक्षय पवार यांनी अर्ज दाखल केेले आहेत. अलीकडे आमदार पाटील व पवार गटात समझोत्याचे राजकारण सुरू झाल्याने येथे अनपेक्षित घडामोडी होण्याची शक्यताही नाकारता येत नाही.‘भोगावती’मध्ये आतापर्यंत पाटील घराण्याचे प्रतिनिधी

  • दत्तात्रय रामजी पाटील (प्रवर्तक)
  • नारायण रामजी पाटील
  • संभाजीराव नारायण पाटील
  • दीपक राजाराम पाटील
  • आमदार पी. एन. पाटील
टॅग्स :kolhapurकोल्हापूरSugar factoryसाखर कारखानेPandurang Patilपांडुरंग पाटील