‘पी. एन.’ सांगतील तोच जिल्हाध्यक्ष

By Admin | Updated: April 1, 2016 01:24 IST2016-04-01T01:19:39+5:302016-04-01T01:24:50+5:30

निवड लांबणीवर : सोनियांच्या दौऱ्यानंतर निर्णय

'P. N. 'the district president said | ‘पी. एन.’ सांगतील तोच जिल्हाध्यक्ष

‘पी. एन.’ सांगतील तोच जिल्हाध्यक्ष

कोल्हापूर : कॉँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बदलण्याच्या हालचाली सुरू असल्या तरी पी. एन. पाटील यांच्या सहमतीशिवाय निवड करणे तितकेसे सोपे नाही. इच्छुकांनी जोरदार फिल्डिंग लावली असली तरी पाटील यांचे आजपर्यंतचे कॉँग्रेस पक्षातील वजन व निष्ठा पाहता ते सांगतील तोच जिल्हाध्यक्ष होणार, हे नक्की आहे.
दहा वर्षांपेक्षा अधिक काळ जिल्हाध्यक्ष व शहराध्यक्ष या पदांवर राहिलेल्यांना बदलण्याची प्रक्रिया कॉँग्रेसमध्ये सुरू आहे. पी. एन. पाटील व प्रल्हाद चव्हाण हे गेली १७ वर्षे पदावर कार्यरत आहेत. पाटील यांच्या कार्यकाळात विधानसभा निवडणुकीचा अपवाद वगळता जिल्हा परिषद, जिल्हा बॅँक, गोकुळ, महापालिकेमध्ये कॉँग्रेसने पकड कायम ठेवल्याने जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीच्या तोंडावर बदल करू नये, अशी प्रमुख पदाधिकाऱ्यांची इच्छा आहे.
बदल होणार म्हणून इच्छुकांनी जोरदार फिल्डिंग लावली असून, प्रकाश आवाडे यांनी तशी उघड मागणी केली आहे. आमदार सतेज पाटील यांनी आवाडे यांना शब्द दिला असला तरी ते स्वत: इच्छुक असल्याचे समजते. जिल्हाध्यक्ष व शहराध्यक्ष या पदांत बदल करायचा झाल्यास पी. एन. पाटील यांची शिफारस महत्त्वाची ठरणार आहे. सोनिया गांधी व राहुल गांधी ११ एप्रिल रोजी नागपूरच्या दौऱ्यावर येत आहेत. त्या तयारीसाठी प्रदेश कॉँग्रेस व्यस्त आहे. अशा गडबडीत बदलाचा निर्णय होणार नाही; त्यामुळे सोनियांच्या दौऱ्यानंतरच अध्यक्ष बदल होण्याची शक्यता आहे.


अनपेक्षित नाव पुढे येणार!
चार वर्षांपूर्वी जिल्हाध्यक्ष निवडीवेळी माजी आमदार संजय घाटगे यांचे नाव पी. एन. पाटील यांनी पुढे आणले. ही निवड वादग्रस्त ठरल्याने ती रद्द केली. यावेळीही बदल करायचा ठरविले तर पाटील अनपेक्षित नाव पुढे करण्याची शक्यता आहे.

पक्षाने अद्याप माझ्याकडे राजीनामा मागितलेला नाही. जिल्हाध्यक्ष बदलाच्या चर्चा प्रसारमाध्यमांतूनच वाचीत आहे. १७ वर्षे काम केल्याने जिल्हाध्यक्ष पदावरून स्वत:हून बाजूला होण्याची तयारी आहे. गेली २७ वर्षे कॉँग्रेसचा सच्चा कार्यकर्ता म्हणून काम करीत आहे. बदल करणार असतील तर हरकत नाही.
- पी. एन. पाटील,
जिल्हाध्यक्ष, कॉँग्रेस

Web Title: 'P. N. 'the district president said

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.