पी. एन. पाटील यांचा वाढदिवस साधेपणाने साजरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:20 IST2021-01-08T05:20:17+5:302021-01-08T05:20:17+5:30

कोल्हापूर : कोरोना महामारीने झालेले नुकसान व समाजातील सर्वच स्‍तरावर झालेला त्‍याचा आर्थिक परिणाम तसेच नवीन येऊ घातलेली कोरोनाची ...

P. N. Celebrate Patil's birthday with simplicity | पी. एन. पाटील यांचा वाढदिवस साधेपणाने साजरा

पी. एन. पाटील यांचा वाढदिवस साधेपणाने साजरा

कोल्हापूर : कोरोना महामारीने झालेले नुकसान व समाजातील सर्वच स्‍तरावर झालेला त्‍याचा आर्थिक परिणाम तसेच नवीन येऊ घातलेली कोरोनाची साथ या पार्श्‍वभूमीवर कर‍वीरचे आमदार पी. एन. पाटील यांनी बुधवारी आपला वाढदिवस अत्‍यंत साधेपणाने केला.

राजारामपुरीत त्‍यांच्‍या निवासस्‍थानी गोकुळ परिवारातर्फे माजी अध्यक्ष व ज्येष्‍ठ संचालक विश्‍वास पाटील यांनी त्‍यांना वाढदिवसाच्‍या शुभेच्‍छा दिल्‍या. ६ जानेवारी म्हणजे आमदार पाटील यांचा वाढदिवस. या दिवशी जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातील अबालवृध्द, तरुण पाटील यांना शुभेच्छा देण्यासाठी राजारामपुरी येथील निवासस्थानी येतात. दिवसभरात हजारो लोक प्रत्यक्ष भेटून, काहीजण फोनवरून शुभेच्छा देतात. मात्र यंदा कोरोनामुळे वाढदिवस साजरा करायचा नाही, असा निर्णय त्यांनी घेतला.

यावेळी गोकुळचे संचालक बाळासाहेब खाडे, राजीवजी सूतगिरणीचे संचालक भारत पाटील-भुयेकर, काँग्रेसचेचे जिल्हा सरचिटणीस शिवाजी कवठेकर, विश्‍वजित पाटील-सडोलीकर, सचिन पाटील, गोकुळचे जनसंपर्क अधिकारी पी. आर. पाटील आदी उपस्थित होते.

फोटो ओळी : काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष आमदार पी. एन. पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त बुधवारी त्यांच्या राजारामपुरी येथील निवासस्थानी ‘गोकुळ‘च्यावतीने ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील यांनी शुभेच्छा दिल्या. यावेळी पी. आर. पाटील, शिवाजी कवठेकर, बाळासाहेब खाडे, भारत पाटील-भुयेकर, सचिन पाटील आदी उपस्थित होते. (फोटो-०६०१२०२१-कोल-गोकुळ)

Web Title: P. N. Celebrate Patil's birthday with simplicity