जुलैअखेर ऑक्सिजननिर्मिती होणार सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2021 04:18 IST2021-07-11T04:18:03+5:302021-07-11T04:18:03+5:30
कोल्हापूर : ऑक्सिजनबाबतीत कोल्हापूर जिल्हा स्वयंपूर्ण होणार असून, जिल्ह्यातील ११ ऑक्सिजननिर्मिती प्लांट जुलैअखेर सुरू होणार आहे. याबाबत शनिवारी पालकमंत्री ...

जुलैअखेर ऑक्सिजननिर्मिती होणार सुरू
कोल्हापूर : ऑक्सिजनबाबतीत कोल्हापूर जिल्हा स्वयंपूर्ण होणार असून, जिल्ह्यातील ११ ऑक्सिजननिर्मिती प्लांट जुलैअखेर सुरू होणार आहे. याबाबत शनिवारी पालकमंत्री सतेज पाटील यांनी आढावा घेतला. यावेळी त्यांनी कोडोली, आयजीएम येथील ऑक्सिजन रिफलिंग आमदार निधीतून तर गडहिंग्लज आणि सीपीआरचे रिफलिंगचा खर्च जिल्हा नियोजनमधून करावे, अशी सूचना केली.
कोरोनाची दुसरी लाट अजूनही जाणवत आहे. त्याआधीच तज्ज्ञांनी तिसऱ्या लाटेचा अंदाज वर्तवला आहे. पार्श्वभूमीवर मंत्री सतेज पाटील यांनी शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालयात ऑक्सिजन प्लांटनिर्मित प्रकल्पांचा आढावा घेतला. ते म्हणाले, आवश्यकतेनुसार ऑक्सिजननिर्मिती प्लांट उभारणीबाबत प्रशासनाने नियोजन केले आहे. त्याचबरोबर जलसंपदा (यांत्रिकी) चे अधीक्षक अभियंता विलास गायकवाड आणि जिल्हा नियोजन अधिकारी विजय पवार यांनी एकत्रित बसून या प्लांटसाठी लोकप्रतिनिधींनी दिलेला निधी कसा वापरायचा याचे नियेाजन करावे. या वेळी त्यांनी प्लांट उभारणीच्या अनुषंगाने महावितरण, शेड उभारणी, जनरेटरसुविधा यांचा आढावा घेतला.
या वेळी प्रभारी जिल्हाधिकारी डॉ. कादंबरी बलकवडे, जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अनिल माळी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता संभाजी माने, निवासी उपजिल्हाधिकारी भाऊसाहेब गलांडे यांच्यासह आरोग्य विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
---
फोटो नं १००७२०२१-कोल-ऑक्सिजन बैठक
ओळ : कोल्हापुरातील जिल्हाधिकारी कार्यालयात शनिवारी पालकमंत्री सतेज पाटील यांनी ऑक्सिजन निर्मिती प्लांट उभारणीचा आढावा घेतला. या वेळी डॉ. अनिल माळी, प्रभारी जिल्हाधिकारी डॉ. कादंबरी बलकवडे, पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.
---