मुश्रीफ फाउंडेशनच्या वतीने महापालिकेला ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2021 04:18 IST2021-06-20T04:18:07+5:302021-06-20T04:18:07+5:30
कोल्हापूर : नामदार हसन मुश्रीफ फाउंडेशनच्या वतीने कोल्हापूर महानगरपालिकेला दहा ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर मशिन्स शनिवारी ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते ...

मुश्रीफ फाउंडेशनच्या वतीने महापालिकेला ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर
कोल्हापूर : नामदार हसन मुश्रीफ फाउंडेशनच्या वतीने कोल्हापूर महानगरपालिकेला दहा ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर मशिन्स शनिवारी ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते शासकीय विश्रामगृहात प्रदान करण्यात आले.
मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले, कोरोना महामारीच्या काळात ऑक्सिजनची टंचाई ओळखून फाउंडेशनच्या वतीने पाचशेहून अधिक कॉन्सन्ट्रेटर मशीन देण्यात आली आहेत. सीपीआरसह कोल्हापूर शहर व जिल्ह्यातील कोविड केअर सेंटर व दवाखान्यांना ही मशिन्स दिली आहेत.
स्थायी समितीचे माजी सभापती राजेश लाटकर म्हणाले, कोरोना महामारीत गेल्या दीड वर्षांपासून ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ कोरोना योद्धा म्हणून अथक संघर्ष करीत आहेत. सामाजिक बांधिलकीतून त्यांनी केलेले काम हिमालय पर्वत एवढे आहे.
यावेळी, महापालिका आयुक्त कादंबरी बलकवडे, माजी आमदार के. पी. पाटील, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील, शहराध्यक्ष आर. के. पोवार, ब्रिस्क फॅसिलिटीज कंपनीचे संचालक चंद्रकांत गायकवाड, उपायुक्त रविकांत अडसूळ, उपायुक्त निखिल मोरे, सहाय्यक आयुक्त चेतन कोंडे, विनायक फाळके, आदिल फरास, संदीप कवाळे, उत्तम कोराणे उपस्थित होते.
फोटो ओळी : नामदार हसन मुश्रीफ फाउंडेशनच्या वतीने शनिवारी शासकीय विश्रामगृहात ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते कोल्हापूर महापालिकेला ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर मशीन प्रदान करण्यात आले. यावेळी राजेश लाटकर, आर. के. पोवार के. पी. पाटील, आयुक्त कादंबरी बलकवडे, ए. वाय. पाटील, आदिल फरास आदी उपस्थित होते. (फोटो-१९०६२०२१-कोल-हसन मुश्रीफ)