ऋतुराज पाटील यांच्याकडून गिरगाव कोविड सेंटरला ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2021 04:23 IST2021-05-19T04:23:12+5:302021-05-19T04:23:12+5:30
यावेळी आमदार ऋतुराज पाटील म्हणाले की, कोरोनाच्या संकट काळात गिरगावमधील युवकांनी पुढाकार घेऊन शंभर बेडचे कोविड केअर सेंटर ...

ऋतुराज पाटील यांच्याकडून गिरगाव कोविड सेंटरला ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर
यावेळी आमदार ऋतुराज पाटील म्हणाले की, कोरोनाच्या संकट काळात गिरगावमधील युवकांनी पुढाकार घेऊन शंभर बेडचे कोविड केअर सेंटर सुरू करून आदर्शवत पाऊल टाकले आहे. यामुळे या परिसरातील रुग्णांना चांगली सेवा मिळेल. येथील स्वयंसेवकांच्या सुरक्षिततेसाठी मास्क, फेसशिल्ड, पॉकेट सॅनिटायझर, ग्लोव्हज् असे साहित्य देण्यात येणार आहे
यावेळी करवीर पंचायत समितीच्या सभापती मीनाक्षी पाटील, पाचगावचे सरपंच संग्राम पाटील, गिरगावचे सरपंच महादेव कांबळे, उपसरपंच जालंधर पाटील, माजी सरपंच दिलीप जाधव, ग्रामसेवक पूनम कांबळे, ग्रामपंचायत सदस्य संतोष सुतार, उत्तम विष्णू पाटील उपस्थित होते.
फोटो : १८ गिरगाव कोविड सेंटर
ओळी :
गिरगाव कोविड सेंटरला ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर प्रदान करताना आ. ऋतुराज पाटील. यावेळी सेंटरचे समन्वयक रूपेश पाटील, पाचगाव सरपंच संग्राम पाटील. करवीर पंचायत समिती सभापती मीनाक्षी पाटील, सरपंच महादेव कांबळे उपस्थित होते.