गडहिंग्लजमध्ये ऑक्सिजन बेड फुल्ल..!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2021 04:26 IST2021-04-27T04:26:42+5:302021-04-27T04:26:42+5:30

उपजिल्हा रुग्णालयांसह गडहिंग्लज शहरातील चार खासगी रुग्णालयातील ऑक्सिजन बेड फुल्ल झाल्याने कोविड रुग्णांवरील उपचाराचा ताण वाढला आहे. त्यामुळे पर्यायी ...

Oxygen bed full in Gadhinglaj ..! | गडहिंग्लजमध्ये ऑक्सिजन बेड फुल्ल..!

गडहिंग्लजमध्ये ऑक्सिजन बेड फुल्ल..!

उपजिल्हा रुग्णालयांसह गडहिंग्लज शहरातील चार खासगी रुग्णालयातील ऑक्सिजन बेड फुल्ल झाल्याने कोविड रुग्णांवरील उपचाराचा ताण वाढला आहे. त्यामुळे पर्यायी व्यवस्थेसाठी आरोग्य विभागासह प्रशासकीय यंत्रणेची धावपळ सुरू आहे.

गेल्यावर्षी कोरोनाच्या पहिल्या लाटेतदेखील गडहिंग्लज विभागातील गडहिंग्लज, आजरा व चंदगड तालुक्यातील रुग्णसंख्या झपाट्याने वाढली. त्यामुळे गडहिंग्लज उपजिल्हा रुग्णालय हे कोविड रुग्णालय म्हणून घोषित करण्यात आले. दरम्यान, काही खासगी डॉक्टरांनीदेखील आपल्या दवाखान्यात कोविड रुग्णांवर उपचाराची सोय केली होती. त्यामुळे सार्वजनिक आरोग्य यंत्रणेवरील ताण काही प्रमाणात कमी झाला होता.

तथापि, दुसऱ्या लाटेत गडहिंग्लज तालुक्यातील कोरोनाबाधितांची संख्या अधिक वेगाने वाढते आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने पुन्हा गडहिंग्लज उपजिल्हा रुग्णालय कोरोनाबाधितांवरच उपचाराचे आदेश दिले आहेत. याशिवाय स्थानिक प्रशासनाने शेंद्री माळावरील शासकीय वसतिगृहात कोविड काळजी केंद्र सुरू केले आहे.

उपजिल्हा रुग्णालय आणि कोविड काळजी केंद्रात मिळून ऑक्सिजन बेडची संख्या सध्या एकूण ६६ आहे; परंतु वाढती रुग्णसंख्या विचारात घेता ही सरकारी सुविधा अपुरी पडत आहे.

-------------------------------------

* गडहिंग्लजमधील ऑक्सिजन बेडची क्षमता अशी

- उपजिल्हा रुग्णालय : ५६

- कोविड काळजी केंद्र शेंद्री माळ : १०

- केसरकर हॉस्पिटल : २०

- देसाई हॉस्पिटल : १०

- अपेक्स आयसीयू सेंटर : १५

- आधार हॉस्पिटल (योगभवन) - २५

- एकूण १३६

-------------------------------------

* २५ एप्रिलअखेरची आकडेवारी अशी

- गडहिंग्लज तालुक्यातील एकूण बाधित : ५१९

- बरे झालेले रुग्ण : ९०

- उपचार घेत असलेले रुग्ण : २९४

- मृत्यू : १५

-------------------------------------

कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी बाहेरून येणाऱ्या नागरिकांचे गावा-गावातच संस्थात्मक अलगीकरण करणे आवश्यक आहे. त्यासंदर्भात ग्राम दक्षता समित्यांना सक्त आदेश दिले आहेत. सौम्य लक्षणे असणाऱ्या रुग्णांच्या उपचारासाठी आयटीआय व गडकरी मेडिकल कॉलेजची इमारत ताब्यात घेणार आहोत. गडहिंग्लज शहरासह महागाव, नेसरी व हलकर्णी या ठिकाणीही कोविड रुग्णांच्या उपचारासाठी खासगी डॉक्टरांनी पुढाकार घ्यावा, यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

- दिनेश पारगे, तहसीलदार.

-------------------------------------

Web Title: Oxygen bed full in Gadhinglaj ..!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.