शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

आईस्क्रिमचे बिल मागितल्याच्या रागातून तरुणास भोसकुन गाडीची तोडफोड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2019 13:39 IST

कोल्हापूर : देवकर पाणंद येथे बिल मागितल्याच्या रागातून परिसरातील फाळकुटदादांनी तरुणास चाकुने भोसकुन आईस्क्रिमच्या गाडीची तोडफोड केली. धिरज शिवाजी ...

ठळक मुद्देआईस्क्रिमचे बिल मागितल्याच्या रागातून तरुणास भोसकुन गाडीची तोडफोडदेवकर पाणंद येथील घटना : दहा फाळकुटदादांवर गुन्हा

कोल्हापूर : देवकर पाणंद येथे बिल मागितल्याच्या रागातून परिसरातील फाळकुटदादांनी तरुणास चाकुने भोसकुन आईस्क्रिमच्या गाडीची तोडफोड केली. धिरज शिवाजी शिंदे (वय २८, रा. संतोष कॉलनी, सानेगुरुजी वसाहत) असे जखमीचे नाव आहे. त्याचेवर सीपीआरमध्ये उपचार करण्यात आले. सोमवारी मध्यरात्री हा प्रकार घडला.परिसरातील दहा ते बारा फाळकुटदादांवर याप्रकरणी जुनाराजवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. जखमी शिंदे याची गळ्यातील दोन तोळ्याची सोन्याची चेन आणि २७ हजार रोकड यावेळी चोरुन नेण्यात आली. या प्रकाराने देवकर पाणंद, सानेगुरुजी वसाहत परिसरात तणाव निर्माण झाला.अधिक माहिती अशी, धीरज शिंदे याची देवकरण पाणंद येथे आईस्क्रिमची गाडी आहे. त्यावर बिहारी कामगार ठेवले आहेत. देवकर पाणंद येथील फाळकुटदादा या गाडीवर रोज येवून फुक्क़ट आईस्क्रिम खात असे. नेहमीप्रमाणे तो सोमवारी साडेदहाच्या सुमारास आला. त्याचेसोबत आणखी नऊ साथीदार होते. या सर्वांनी दहा आईस्क्रिम घेतली. त्याचे बिल तीनशे रुपये झाले.

कामगाराने बिल मागितलेनंतर फाळकुटदादाने बिल मागतो काय, इलाका माझा आहे. बिल देत नाही, गाडी चालावायची आहे तर आईस्क्रिम फुकट दिले पाहिजे असा दम दिला. बिथरलेल्या कामगाराने धीरज शिंदे याला फोन करुन बोलवून घेतले. शिंदे याने एक आईस्क्रिम फुकट ठिक आहे, दहा देणे शक्य नाही असे म्हटल्यावर संशयित थांब तुला आता सोडत नाही, असे म्हणून निघून गेले.

रात्री साडेअकराच्या सुमारास गाडी बंद करुन घरी जात असताना संशयित चाकु, बांबु, दगड घेवून आले. आम्हाला दमदाटी करतोस काय, म्हणून आईस्क्रिमच्या गाडीची तोडफोड करुन धीरजवर चाकुने हल्ला केला. याप्रकाराने देवकर पाणंद परिसरात गोंधळ उडाला.

कामगारांनी जखमी धीरजला सीपीआरमध्ये दाखल केले. या फाळकुटदादांनी चार दिवसापूर्वी फुक्कट आईस्क्रिम दिले नाही म्हणून धीरज शिंदे याचेशी वादावादी केली होती. आईस्क्रिम फुकट दिले नाही तर परिसरात धंदा करायचा नाही, अशी धमकी फाळकुटदादाने दिली होती. परिसरातील काही राजकीय पुढाऱ्यांनी मध्यस्थी करीत वाद मिटविला होता. पोलीस निरीक्षक मानसिंह खोचे तपास करीत आहेत. 

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीkolhapurकोल्हापूर