कोरोनाग्रस्त रुग्णांसाठी दिली स्वत:ची कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2021 04:23 IST2021-05-24T04:23:06+5:302021-05-24T04:23:06+5:30

शुभम गायकवाड : उदगांव चिंचवाड (ता. शिरोळ) येथे कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. येथील गावभाग व हाळभाग मिळून ...

Own car for coronary patients | कोरोनाग्रस्त रुग्णांसाठी दिली स्वत:ची कार

कोरोनाग्रस्त रुग्णांसाठी दिली स्वत:ची कार

शुभम गायकवाड : उदगांव चिंचवाड (ता. शिरोळ) येथे कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. येथील गावभाग व हाळभाग मिळून दीडशेच्या आसपास कोरोनाचे रुग्ण झाले आहेत. गावातील रुग्ण दवाखान्यात पोहोचविण्यासाठी ना नातेवाईकांना गाडी मिळत होती ना रुग्णाच्या घरी भाजीपाला मिळत होता म्हणून येथील तरुणांनी स्वत:ची चारचाकी तर दिली. शिवाय कोरोनाग्रस्तांच्या घरी किराणा साहित्य पोहोच केले. या कृतीचे ग्रामस्थांतून कौतुक होत आहे.

जिल्ह्यात गेले आठ दिवस लॉकडाऊन आहे. सर्वच ठिकाणची रेलचेल कमी झालेली दिसून येत आहे. चिंचवाडमध्ये कोरोनाचा वाढता आलेख चिंताजनक आहे. येथे ग्रामस्थांनी केलेला निष्काळजीपणा त्यांच्याच जीवावर बेतला आहे. रुग्णांना दवाखान्यात न्यायला प्रत्येकवेळी रुग्णवाहिका येईलच याची शाश्वती नाही म्हणून येथील बाळासाहेब ठोमके यांनी स्वत:ची चारचाकी गाडी रुग्णांना ने-आण करण्यासाठी दिली आहे. तर अमोल चौगुले, स्वप्निल चौगुले या युवकांनी अलगीकरण व कोरोनाग्रस्तांच्या घरी भाजीपाला व किराणा साहित्य उपलब्ध करून दिले आहे. तरुणांच्या या कृतीने ग्रामस्थांची चांगली सोय होत आहे. त्यामुळे त्यांचे परिसरातून कौतुक होत आहे.

-

कोट - गावातील युवक हे कोरोनाग्रस्तांच्या घरी मदत करत आहेत. त्यांना ने-आण करण्यासाठी मदत करत आहेत. हे कौतुकास्पद आहे. गावातील माळभाग परिसरात रुग्ण वाढत आहेत. ते थांबविण्यासाठी प्रयत्न होत आहेत. ग्रामस्थांनीही नियमांचे पालन करावे.

- ज्योती काटकर, सरपंच

Web Title: Own car for coronary patients