शेतकऱ्यांना सर्वतोपरी सहकार्य

By Admin | Updated: January 21, 2015 23:51 IST2015-01-21T21:31:15+5:302015-01-21T23:51:19+5:30

संजयकाका पाटील : गणेशवाडीत ‘गणराया अवॉर्ड’चे वितरण

Overall cooperation with the farmers | शेतकऱ्यांना सर्वतोपरी सहकार्य

शेतकऱ्यांना सर्वतोपरी सहकार्य

बुबनाळ : भारत हा कृषिप्रधान देश आहे. या कृषिप्रधान देशात शेतीशी सर्व संबंधित घटकास केंद्र व राज्य शासनाकडून सर्वतोपरी सहकार्य करून शासनाच्या योजना तळागाळापर्यंत पोहोचवून देशातील शेतकरी वर्गाला अच्छे दिन आणू, असा ठाम विश्वास सांगलीचे खासदार संजयकाका पाटील यांनी व्यक्त केला.गणेशवाडी (ता. शिरोळ) येथे भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्यावतीने आयोजित गणराया अवॉर्ड व वितरण कार्यक्रम व सत्कार या संयुक्त कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी अरुण वास्कर होते. ऋषिकेश काणे यांनी प्रास्ताविक केले. यावेळी आमदार सुरेश हाळवणकर म्हणाले, भारताला स्वच्छ व चारित्र्यसंपन्न पंतप्रधानांच्या रूपात नरेंद्र मोदी लाभले आहेत. म्हणून काही दिवसांतच बाजारातील जीवनावश्यक वस्तंूचे दर कमी झाले आहेत. यावेळी खासदार संजयकाका पाटील यांच्या हस्ते ‘गणराया अवॉर्ड-२0१४’ चे वितरण करण्यात आले. प्रथम क्रमांक - गजराज मित्र मंडळ, द्वितीय - क्रांती तरुण मंडळ, तृतीय क्रमांक - विनायक व गणेश मित्र मंडळाला विभागून देण्यात आला. यावेळी डॉ. संजय पाटील, सुरेशदादा पाटील, अनिल डाळ्या, आदींनी मनोगत व्यक्त केले. भाजपच्या शाखेच्या नामफलकाचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते झाले. याप्रसंगी तालुकाध्यक्ष महावीर तकडे, भारत गुरव, गजानन देवताळी, जयपाल माणगावे, शामराव दाते, विद्याधर उदगावे, प्रदीप तेली, संकाजी साळुंखे, अवधूत भट्ट, योगेश कवठेकर, सुरेश अंकलखोपे, सुरेश झळके, आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते. (वार्ताहर)

Web Title: Overall cooperation with the farmers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.