शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

युवतींच्या वशीकरणासाठी भुदरगड तालुक्यात अघोरी प्रकार: तीव्र संताप

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2025 21:19 IST

बाभळीच्या झाडाला लावले युवतींचे फोटो, दाभण, बिब्बे अन् लिंबूही..

शिवाजी सावंत, लोकमत न्यूज नेटवर्क, गारगोटी: आकुर्डे-महालवाडी (ता.भुदरगड) दरम्यानच्या "कुरण'नावाच्या शेतातील गवताच्या माळावर अघोरी जादूटोण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. गुरुवारी अमावस्येच्या रात्री तीन ते चार प्रेमवीरांनी बाभळीच्या झाडावर युवतींचे फोटो, दाभण, बिब्बे, लिंबू लावून अघोरी जादूटोणा करून इच्छित तरुणीला वश करण्याचा प्रयत्न केल्याची चर्चा आहे. या प्रकाराने परिसरात खळबळ उडाली आहे. अंनिसच्या कार्यकर्त्यांनी याचा निषेध केला आहे.

आकुर्डे-महालवाडी दरम्यान दहा एकराच्या विस्तीर्ण माळरानावर केवळ एकच बाभळीचे झाड आहे. या झाडावर तीन मुलींच्या फोटोवर लिंबू आणि दाभण मारलेले आढळले.काळ्या बाहुल्याही अडकवलेल्या होत्या. त्यापैकी एका बाहुलीवर युवतीचा फोटो होता.तर एका युवतीच्या आई,वडील आणि आजीचे फोटो झाडाच्या फांद्यांवर लटकवलेले होते. हा अघोरी प्रकार गुरुवारी अमावस्येच्या मध्यरात्री घडला आहे.

महालवाडी येथील ग्रामदैवताच्या यात्रेच्या निमित्ताने पाच तारखेला विविध स्पर्धांचे आयोजन करण्यासाठी ग्रामस्थ कुरण माळावर मैदान करण्यासाठी गेले होते. त्यावेळी त्यांना हा अघोरी प्रकार निदर्शनास आला.या घटनेची माहिती परिसरात पसरल्यानंतर बघ्यांनी आणि ग्रामस्थांनी घटनास्थळी गर्दी केली.विज्ञानाच्या युगात अशा अंधश्रद्धेच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.

या घटनेची माहिती मिळताच अंधश्रध्दा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांनी याठिकाणी भेट देऊन या घटनेचा निषेध नोदवला.तेथील सगळ्या वस्तूंची विल्हेवाट लावली.  यामध्ये अंनिस तालुका अध्यक्ष अमोल थडके,महिला सहभाग विभाग प्रमुख प्रा.ज्योती थडके,अनिस कार्यकर्ते रितेश चौगले,गुरुनाथ चौगले,हर्षवर्धन कोराणे,पंकज इंदुलकर यांनी सहभाग घेतला होता.

राज्यात अंधश्रद्धा आणि जादूटोणा प्रतिबंधक कायदा अस्तित्वात असूनही भुदरगड तालुक्यात वारंवार अघोरी प्रकार घडत आहेत. यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अंधश्रद्धेला खतपाणी घालणाऱ्या या घटनां मागील अज्ञात व्यक्तींचा शोध घेऊन त्यांच्यावर प्रशासनाने कडक कारवाई करावी. अंधश्रद्धा निर्मूलनासाठी जादूटोणा विरोधी कायदा याविषयी जनजागृती करून प्रभावी उपाययोजना राबविण्याची गरज अधोरेखित होत आहे. यासाठी प्रशासनाने पुढाकार घ्यायला हवा. - अमोल थडके (तालुकाध्यक्ष,अंधश्रध्दा निर्मुलन समिती भुदरगड)

दरम्यान याबाबत प्रेमवीरांचा शोध घेऊन त्यांच्यावर जादूटोणाविरोधी कायदेंतर्गत गुन्हा दाखल करून कडक कारवाई करावी.या मागणीचे निवेदन पुरोगामी विचार मंच, भुदरगड यांच्यावतीने उपनिरीक्षक योगेश गोरे यांना देण्यात आले.यावेळी अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राजेंद्र यादव, कॉ.सम्राट मोरे,मच्छिंद्र मुगडे,के.के.भारतीय, संतोष कडव यासह पुरोगामी विचार मंचचे पदाधिकारी उपस्थित होते.  युवतींच्या ड्रेसची बटणेही... काळ्या बाहुल्या बरोबरच युवतींचे फोटोही झाडाला बांधले होते. दाभणामध्ये युवतींच्या ड्रेसची बटने काळ्या दोऱ्यामध्ये अडकलेली होती.या अघोरी प्रकारामुळे पालकांतून तीव्र संताप व्यक्त होत आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूर