माजगाव परिसरात लोकरी माव्याचा प्रादुर्भाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2021 04:18 IST2021-05-31T04:18:55+5:302021-05-31T04:18:55+5:30
यवलूज वार्ताहर - पन्हाळा तालुक्यात यंदा उन्हाळ्यात उष्ण दमट वातावरण आणि वळीवाच्या पावसामुळे ऊस पिकाला एक प्रकारचा 'बूस्टर ...

माजगाव परिसरात लोकरी माव्याचा प्रादुर्भाव
यवलूज वार्ताहर - पन्हाळा तालुक्यात यंदा उन्हाळ्यात उष्ण दमट वातावरण आणि वळीवाच्या पावसामुळे ऊस पिकाला एक प्रकारचा 'बूस्टर डोस' मिळाला आहे. परिणामी ऊस पीक जोमदार आले आहे. पण दुसरीकडे उसावर लोकरी माव्याचा प्रसार झपाट्याने वाढत असल्यामुळे नुकसान टाळण्यासाठी शेतकऱ्यांना कीटकनाशके फवारणी करावी लागत आहे. यासाठी कृषी विभागाने मार्गदर्शन करावे, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
कासारी नदीला बारमाही मुबलक पाणी उपलब्ध असल्याने बहुतांशी शेतकरी ऊसाचे पीक घेतात. यंदा मार्च ते मे महिन्यात वळिवाने दमदार हजेरी लावली. वळीव पावसामुळे उसाला नत्रखताची मात्रा चांगल्या प्रकारे मिळाली. ऊस तजेलदार होऊन वाढ जोमदार झाली आडसाली ऊस लागणीचा उसही यावेळी खूपच जोमात आहे. प्रामुख्याने या उसावर पांढरा लोकरी माव्याचा प्रसार झपाट्याने वाढत असून लोकरी माव्याचे कीटक उसाच्या पानातील शर्करा शोषून घेत आहेत. परिणामी उसाची वाढ खुंटत असल्याने नुकसान होऊन याचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे. कोरोना महामारीतही लोकरी माव्याचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी बऱ्याचदा शेतकऱ्यांना उसावर विषारी कीटकनाशके फवारणी करावी लागत आहे.
फोटो ओळ : माजगाव परिसरात उसावर लोकरी माव्याच्या प्रादुर्भाव.