शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
4
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
5
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
6
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
7
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
8
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
9
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
10
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
11
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
12
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
13
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
14
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
15
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
16
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
17
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
18
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
19
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
20
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur Municipal Election 2026: कोल्हापुरात दोन ठिकाणी वादावादी, २१ अर्ज ठरले बाद; छाननीची प्रक्रिया पूर्ण

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2026 12:03 IST

आता लक्ष अर्ज माघारीकडे

कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीत दाखल झालेल्या ८२० पैकी २१ नामनिर्देशनपत्रे बुधवारी छाननीत अवैध ठरली. दोन निवडणूक कार्यालयांत झालेली किरकोळ वादावादी वगळता छाननी प्रक्रिया शांततेत पार पडली. या छाननीदरम्यान, सर्व सातही निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या कार्यालयात उमेदवार व समर्थकांनी गर्दी केली होती. यावेळी चोख पोलिस बंदोबस्तही ठेवण्यात आला होता. आता उमेदवारांच्या व राजकीय पक्षांच्या जोडण्या आपल्याला जड जाणाऱ्या तुल्यबळ उमेदवाराने माघार घ्यावी, यासाठी सुरू झाल्या आहेत.कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीतील राजकीय पक्षांची इर्षा लक्षात घेता छाननीवेळी वादविवाद होतील, तणाव निर्माण होईल, असे वाटले होते. परंतु, सर्व प्रक्रिया शांततेत आणि तणावविरहित वातावरणात पार पडल्याने प्रशासनाने सुटकेचा नि:श्वास सोडला.सकाळी ११ वाजता एकाचवेळी सातही निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयांत नामनिर्देशनपत्रांची छाननी सुरू झाली. एक एक उमेदवाराचे नाव पुकारत छाननी पूर्ण केली जात होती. कोणाची हरकत नसेल तर पुढील नाव पुकारले जात होते. ज्यांच्या नामनिर्देशनपत्रांवर हरकत आहे त्यांचे म्हणणे तसेच उमेदवाराचे म्हणणे ऐकून घेतले जात होते.

यांचे अर्ज ठरले बादबुधवारी झालेल्या छाननीत प्रशांत माळी (५ अ), देवेंद्र जोंधळे (३ अ), वंदना मोहिते (३ क), जयश्री वकीलकर (४ अ), सुनीता माने (४ ब), अर्णव संकपाळ (४ क), विजय गायकवाड ( १५ अ), धनश्री जाधव (६ क), श्रीराम देशपांडे (६ ड), आसमा मुल्लीणी (७ ब व ८ ब), शीतल भालेकर (८ अ), रमेश खाडे (८ ड), अरुणा पाटील ( (८ ड), विजय दरवान (११ ड), संदीप सावंत (१९ ड), शेखर साळवी (१२ अ), शाबाद अत्तार (१३ ड), वैशाली मिसाळ (१७ अ), महेजबीन शेख (१८ ब) यांचे अर्ज बाद ठरले.

उत्तुरे, आजरेकर यांच्या अर्जावर हरकत

राजारामपुरी व्ही. टी. पाटील सभागृहात उद्धवसेनेच्या उमेदवार प्रतिज्ञा महेश उत्तुरे यांच्या नामनिर्देशनपत्रावर हरकत दाखल झाली. त्यावर बराच वेळ चर्चा, वाद सुरू होता. सुमारे दोन तास त्यावर चर्चा सुरू होती. परंतु, सायंकाळी हरकतदारानेच माघार घेतली. शहाजी महाविद्यालयातील यशवंतराव चव्हाण सभागृहात प्रभाग क्रमांक १२ अ मधील आश्कीन गणी आजरेकर यांच्या अर्जावर देखील हरकत घेण्यात आली होती, परंतु ती फेटाळण्यात आली.

English
हिंदी सारांश
Web Title : Kolhapur Election 2026: 21 Applications Rejected After Scrutiny

Web Summary : Kolhapur Municipal Election saw 21 applications rejected after scrutiny. Minor disputes occurred, but the process was largely peaceful. Political maneuvering has begun as candidates try to consolidate their positions before final nominations.
टॅग्स :Kolhapur Municipal Corporation Electionकोल्हापूर महानगरपालिका निवडणूक २०२६kolhapurकोल्हापूरMunicipal Electionमहानगरपालिका - नगरपालिका निवडणूक २०२६