आमचंही पहिलं प्रेम कुस्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2021 04:25 IST2021-02-16T04:25:03+5:302021-02-16T04:25:03+5:30

कोल्हापूर : राजर्षी शाहू महाराजांनी १९१२ ला रोमच्या कोलेझियमच्या धर्तीवर खासबाग कुस्ती मैदान बांधले. अशा ऐतिहासिक मैदानाची लाॅकडाऊनमुळे दुरवस्था ...

Our first love is wrestling | आमचंही पहिलं प्रेम कुस्ती

आमचंही पहिलं प्रेम कुस्ती

कोल्हापूर : राजर्षी शाहू महाराजांनी १९१२ ला रोमच्या कोलेझियमच्या धर्तीवर खासबाग कुस्ती मैदान बांधले. अशा ऐतिहासिक मैदानाची लाॅकडाऊनमुळे दुरवस्था झाली होती. त्या सर्व जगाच्या दृष्टीने व्हॅलेंटाईन डे हा प्रेमाचा दिवस असेल, तर आमचेही पहिले प्रेम कुस्ती आहे. म्हणून कुस्तीमल्ल विद्या महासंघ, कोल्हापूर शाखेतर्फे रविवारी या मैदानाची स्वच्छता करण्यात आली.

कुस्तीच्या वैभवकाळात शाहू महाराजांनी जगज्जेता गामा, इमामबक्ष, गुंगा यांसह व्यंकप्पा बुरुड यांच्यासारख्या मल्लांना मैदानात लढविले. स्वातंत्र्योत्तर काळात श्रीपती खंचनाळे, मारुती माने, गणपतराव आंदळकर, हरिश्चंद्र बिराजदार, दादू चौगुले, युवराज पाटील यांसह दिग्गज या मैदानात लढले. अशा ऐतिहासिक मैदानाची कोरोनामुळे लाॅकडाऊनच्या काळात दुरवस्था झाली होती. १४ फेब्रुवारी अर्थात व्हॅलेंटाईन डेचा मुहूर्त साधत मल्लविद्या महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी मैदानाची स्वच्छता मोहीम राबविली. व्हॅलेंटाईन डे हा साऱ्या जगासाठी प्रेमाचा दिवस असेल, तर आमचेही पहिले प्रेम कुस्ती आहे. त्यामुळे आम्ही खासबाग कुस्ती मैदानाची स्वच्छता केली, असा संदेश या महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी यानिमित्त दिला. या मोहिमेत महासंघाचे संस्थापक-अध्यक्ष गणेश मानुगडे, दत्तात्रय ठाणेकर, जयवंत पाटील, परशुराम बांगे, विक्रम माने, सचिन राठोड, सागर बिडकर, दत्तात्रय गावडे, आदी श्रमदान करीत ही मोहीम राबविली.

फोटो : १४०२२०२१-कोल-कुस्ती

ओळी : कोल्हापुरातील राजर्षी शाहू खासबाग कुस्ती मैदानाची व्हॅलेंटाईन डेनिमित्त कुस्ती मल्ल विद्या महासंघातर्फे स्वच्छता मोहीम राबविली.

Web Title: Our first love is wrestling