अन्यथा इचलकरंजी योजनेचे काम बंद पाडू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2021 04:21 IST2021-01-21T04:21:55+5:302021-01-21T04:21:55+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क कुरुंदवाड : इचलकरंजी नगरपालिकेकडून कृष्णा जलवाहिनी योजनेची पाईपलाईन नव्याने टाकण्याचे काम सुरु आहे. मात्र, सार्वजनिक बांधकाम ...

अन्यथा इचलकरंजी योजनेचे काम बंद पाडू
लोकमत न्यूज नेटवर्क
कुरुंदवाड : इचलकरंजी नगरपालिकेकडून कृष्णा जलवाहिनी योजनेची पाईपलाईन नव्याने टाकण्याचे काम सुरु आहे. मात्र, सार्वजनिक बांधकाम विभागाने घालून दिलेल्या अटी व शर्तींचा भंग करून या योजनेचे काम सुरु असल्याने या कामाची चौकशी करुन ठेकेदार व नगरपालिका अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करावेत, अन्यथा ग्रामस्थांना घेऊन योजनेचे काम बंद पाडण्याचा इशारा शिरढोण (ता. शिरोळ) येथील सामाजिक कार्यकर्ते नागेश कोळी व प्रवीण दानोळे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला निवेदनाद्वारे दिला आहे.
इचलकरंजी नगरपालिका योजनेची कुरुंदवाड, शिरढोण, टाकवडे या मार्गावरून नव्याने जलवाहिनी टाकण्यात येत आहे. रस्त्याच्या मध्यभागापासून ८ मीटर अंतरावर खोदाई करुन जलवाहिनी टाकणे बंधनकारक आहे. मात्र, असे असताना सार्वजनिक बांधकाम विभागाचे नियम धाब्यावर बसवून रस्त्यालगतच जलवाहिनी टाकली जात आहे. रस्त्याच्या रुंदीकरणासाठी निधी मंजूर आहे. मात्र, जलवाहिनीमुळे या कामात अडचण निर्माण होणार असल्याने नियमबाह्य जलवाहिनी योजनेचे काम करणाऱ्या ठेकेदार व या विभागातील पालिका अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी या निवेदनातून केली आहे.