शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

...अन्यथा गडहिंग्लज विभागातही जनता कर्फ्यू लावावा लागेल :  मुश्रीफ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2021 18:44 IST

CoronaVirus HasanMusrif Kolhapur : गडहिंग्लज विभागात दिवसेंदिवस कोरोनाची रुग्णसंख्या वाढत चालली आहे. मृत्युचे प्रमाणही वाढले आहे. त्यामुळे परिस्थिती हाताबाहेर जाण्यापूर्वी लोकांनी काळजी घ्यावी.अन्यथा कागलप्रमाणे गडहिंग्लज विभागातही कडक जनता कर्फ्यू लावावा लागेल, असा इशारा ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी गडहिंग्लज, चंदगड व आजरा तालुक्यातील जनतेला शनिवारी (८) इशारा दिला.

ठळक मुद्दे...अन्यथा गडहिंग्लज विभागातही जनता कर्फ्यू लावावा लागेल :  मुश्रीफहसन मुश्रीफ यांनी दिला गडहिंग्लज, चंदगड व आजरेकरांना इशारा

गडहिंग्लज : गडहिंग्लज विभागात दिवसेंदिवस कोरोनाची रुग्णसंख्या वाढत चालली आहे. मृत्युचे प्रमाणही वाढले आहे. त्यामुळे परिस्थिती हाताबाहेर जाण्यापूर्वी लोकांनी काळजी घ्यावी.अन्यथा कागलप्रमाणे गडहिंग्लज विभागातही कडक जनता कर्फ्यू लावावा लागेल, असा इशारा ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी गडहिंग्लज, चंदगड व आजरा तालुक्यातील जनतेला शनिवारी (८) इशारा दिला.गडहिंग्लज पंचायत समितीच्या सभागृहात आयोजित कोरोना परिस्थितीच्या आढावा बैठकीत ते बोलत होते.चंदगडचे आमदार राजेश पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. मुश्रीफ म्हणाले, कोरोना बाधितांचा मृत्युदर देशात कोल्हापूरचा अधिक आहे.त्यामुळे लक्षणे दिसताच नागरिकांनी स्वत:हून चाचण्या करून घ्याव्यात. तपासण्या न झाल्यामुळेच रुग्णसंख्या वाढती आहे. तरुणांच्या मृत्युचे प्रमाण चिंताजनक आहे. त्यामुळे हॉटस्पॉट असणार्‍या गावात रेडअलर्ट घोषित करुन सर्वांच्या चाचण्या करून घ्याव्यात.बैठकीस गडहिंग्लजच्या प्रांताधिकारी विजया पांगारकर, भूदरगडचे प्रांताधिकारी डॉ.संपत खिलारी, पोलीस उपअधीक्षक गणेश इंगळे, गडहिंग्लजचे तहसिलदार दिनेश पारगे,आजऱ्याचे विकास अहिर, चंदगडचे विनोद रणावरे, गटविकास अधिकारी शरद मगर, मुख्याधिकारी नागेंद्र मुतकेकर, डॉ.चंद्रकांत खोत, रामाप्पा करिगार, उदय जोशी, अभय देसाई,आदी उपस्थित होते.बाधितांच्या प्रमाणात राज्यांना मदत द्या..!तिसर्‍या लाटेपूर्वी महाराष्ट्रातील लसीकरण पूर्ण करण्याचे राज्याचे उद्दिष्ट आहे.परंतु, सीरम, पुनावालासह स्फुटनिकच्या लसीचे सर्व अधिकार केंद्राने आपल्याकडे घेतले आहेत. लसीच्या वाटपात हस्तक्षेप न करता केंद्र शासनाने बाधितांच्या प्रमाणात सर्वच राज्यांना सर्वप्रकारची मदत करावी, अशी मागणी मंत्री मुश्रीफ यांनी केली.

गडहिंग्लज विभागात आणखी ३९० बेडगडहिंग्लज विभागातील वाढत्या रुग्णसंख्येमुळे बेडची कमतरता भासत आहे. त्यामुळे गडहिंग्लज तालुक्यात १८०,चंदगड तालुक्यात ११० व आजरा तालुक्यात १०० असे एकूण आणखी ३९० बेडचे नियोजन करण्यात येईल,असेही मुश्रीफ यांनी सांगितले. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याHasan Mushrifहसन मुश्रीफkolhapurकोल्हापूर