शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
4
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
5
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
6
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
7
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
8
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
9
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
10
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

...अन्यथा पणतीचे रूपांतर मशालीत : सकल मराठा समाजाचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 7, 2018 12:41 IST

शासनाने मराठा आरक्षणासंदर्भात पंधरा दिवसांत निर्णय न घेतल्यास पणतीचे रूपांतर मशालीत होऊन याचा वणवा राज्यभर पसरेल, असा इशारा सकल मराठा समाजातर्फे देण्यात आला. तसेच शासनाच्या डोक्यात प्रकाश पडावा, यासाठी कसबा बावड्यातील शाहू जन्मस्थळ येथे शेकडो दीप प्रज्वलित करण्यात आले.

ठळक मुद्दे ...अन्यथा पणतीचे रूपांतर मशालीत : सकल मराठा समाजाचा इशारा आरक्षणाचा निर्णय पंधरा दिवसांत घ्या, शाहू जन्मस्थळ येथे दीपोत्सव

कोल्हापूर : शासनाने मराठा आरक्षणासंदर्भात पंधरा दिवसांत निर्णय न घेतल्यास पणतीचे रूपांतर मशालीत होऊन याचा वणवा राज्यभर पसरेल, असा इशारा सकल मराठा समाजातर्फे देण्यात आला. तसेच शासनाच्या डोक्यात प्रकाश पडावा, यासाठी कसबा बावड्यातील शाहू जन्मस्थळ येथे शेकडो दीप प्रज्वलित करण्यात आले.दीपावलीचे औचित्य साधून सकल मराठा समाजातर्फे छत्रपती शाहू महाराज यांच्या कसबा बावडा येथील जन्मस्थळी  सायंकाळी सहा वाजता दीप प्रज्वलित करून दीपोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.

 कोल्हापुरातील कसबा बावड्यातील शाहू जन्मस्थळ येथे दीपावलीनिमित्त सकल मराठा समाजातर्फे आयोजित दीपोत्सवामध्ये सुंदर रांगोळ्या काढून सर्वांचे लक्ष वेधले.(छाया : दीपक जाधव)सुरुवातीला शाहीर दिलीप सावंत यांचा शाहिरी मुजरा झाला. नंतर वसंतराव मुळीक, इंद्रजित सावंत, दिलीप देसाई, गुलाबराव घोरपडे, संभाजी जगदाळे, हर्षल सुर्वे, आदींच्या हस्ते राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमेस अभिवादन करून दीपोत्सव करण्यात आला. बघता-बघता काही वेळातच शाहू जन्मस्थळ शेकडो पणत्यांनी उजळून निघाले. फूल रांगोळ्यांनी परिसर सजला होता. 

मराठा समाज आरक्षण व इतर मागण्यांसाठी ४० दिवस आंदोलन केले होते. १ सप्टेंबर २०१८ रोजी राज्य सरकारतर्फे शाहू जन्मस्थळ येथे लेखी आश्वासन दिले. त्याला दोन महिने पूर्ण झाले; पण सरकारने अद्याप कोणत्याही आश्वासनाची पूर्तता केलेली नाही; म्हणून राज्य सरकारच्या डोक्यात प्रकाश पडावा, या भावनेने हा उपक्रम घेण्यात आल्याचे समन्वयकांनी सांगितले.मराठा आरक्षणाचा प्रश्न १५ दिवसांत न मिटल्यास शाहू जन्मस्थळावर प्रज्वलित केलेल्या पणत्यांचे रूपांतर मशालीत होऊन याचा वणवा राज्यभर पसरेल, हे सरकारने लक्षात घ्यावे, असा इशाराही समन्वयकांनी यावेळी दिला.यावेळी नगरसेवक मोहन सालपे, किशोर घाटगे, सचिन पाटील, स्वप्निल पार्टे, महादेव पाटील, शशिकांत पाटील, अवधूत पाटील, प्रकाश पाटील यांच्यासह कागलवाडी मित्रमंडळाचे कार्यकर्ते रवींद्र रेडेकर, शशिकांत पाटील, मयूर पाटील, बबन कदम, गौरव पाटील, आदी उपस्थित होते. 

 

टॅग्स :Shahu Maharaj Chhatrapatiशाहू महाराज छत्रपतीmarathaमराठाkolhapurकोल्हापूरDiwaliदिवाळी