शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

ओबीसीत अन्य समाजाचा समावेश नकोच, कोल्हापुरातील सकल ओबीसी समाजाची मागणी 

By इंदुमती सूर्यवंशी | Updated: December 8, 2023 18:58 IST

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने

कोल्हापूर : ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता व त्यात प्रबळ समाजाचा समावेश न करता अन्य समाजाला आरक्षण द्यावे, राज्यातील नागरिकांची जातनिहाय जनगणना व्हावी, खुल्या व प्रबळ गटातील विद्यार्थ्याप्रमाणे भटके, विमुक्त व ओबीसी समाजातील विद्यार्थ्यांनाही निर्वाह भत्ता द्यावा, स्वतंत्र वसतिगृह निर्माण करावे अशा विविध मागण्या सकल ओबीसी समाजाच्यावतीने शुक्रवारी जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या माध्यमातून राज्य शासनाकडे करण्यात आल्या.नितीन ब्रम्हपूरे, बाबूराव बोडके, भारत लोखंडे, बाळासो लोहार अशा विविध समाजाच्या पदाधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केल्यानंतर या मागणीचे निवेदन दिले. भटके विमुक्त व ओबीसींच्या महाज्योती संस्थेची जिल्हावार कार्यालये तात्काळ सुरू करावी, पीएचडी करणाऱ्या ओबीसी विद्यार्थ्यांना सरसकट फेलोशीप मिळावी, ओबीसी वित्त व विकास महामंडळाला एक हजार कोटी रुपये द्यावे, भटके विमुक्त व ओबीसींसाठी जाहीर केलेल्या महामंडळांना पुरेसा निधी द्यावा, राज्यातील ओबीसी नेत्यांना पोलीस संरक्षण द्यावे व त्यांच्यावर हीन पातळीवरील टिका करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करावी. ओेबीसीप्रमाणे किंबहुना त्याहून अधिक सवलती आरक्षणाची मागणी करणाऱ्या समाजाला मिळाल्या आहेत. कोट्यावधींचा निधी मिळाला आहे. या उलट ओबीसी व भटके विुमक्त जातींना दुजाभावाची वागणूक दिली जात आहे. त्यांचा ओबीसींंमध्ये समावेश न करता किंवा ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता आरक्षण द्यावे अन्यथा ओबीसी समाजाला कठोर निर्णय घ्यावा लागेल असा इशारा निवेदनात दिला आहे.यावेळी कुंभार, वैश्यवाणी, लोहार, नाभीक, परीट, धनगर, सुतार, दैवज्ञ सोनार, सणगर, जैन पंचम, गुरव, आर्य क्षत्रिय, शिंपी, देवांग कोष्टी, तेली, लिंगायत, भोई, लिंगायत गवळी, स्वकुळ साळी, रजपूत घिसाडी, घडशी, बागडी अशा विविध समाजातील पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरOBC Reservationओबीसी आरक्षणagitationआंदोलन