वीरकुमार पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2021 04:24 IST2021-02-10T04:24:18+5:302021-02-10T04:24:18+5:30
१० रोजी सकाळी ८.३० वाजता ग्रामपंचायत व ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने प्रियदर्शनी महिला पतसंस्थेच्या चेअरमन आशाराणी वीरकुमार पाटील ...

वीरकुमार पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन
१० रोजी सकाळी ८.३० वाजता ग्रामपंचायत व ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने प्रियदर्शनी महिला पतसंस्थेच्या चेअरमन आशाराणी वीरकुमार पाटील यांचा सत्कार करण्यात येणार आहे. ९ वाजता अंगणवाडीतील मुलांना दूध वाटप, १० वाजता भीमनगरमधील व्यायाम शाळेचे उद्घाटन, त्यानंतर पूर्णानंद महाराज मठ या ठिकाणी बालरोग तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले आहे. ११ वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगरमधील व्यायाम शाळेचे उद्घाटन, ११.३० वाजता निपाणी येथील महात्मा गांधी शासकीय रुग्णालयामध्ये रुग्णांना फळे वाटप, यानंतर हणबरवाडी येथे रस्ता उद्घाटन, त्यानंतर हणबरवाडी व दत्तवाडी येथील अंगणवाडीतील मुलांना दूध वाटप, दत्तवाडी येथील रस्त्याच्या कॉंक्रिटीकरणाचे उद्घाटन, दुपारी ३ वाजता पूर्णानंद महाराज मठामध्ये किशोरवयीन मुलींसाठी "कळी उमलताना" या विषयावर आरोग्य शिबिर तसेच सायंकाळी ७ वा कोगनोळी हायस्कूलच्या पटांगणावरती क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती वाढदिवस गौरव समितीने दिली आहे.