फेरीवाल्यांसाठी सोमवारपासून ‘स्वनिधी से समृध्दी’ शिबिराचे आयोजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2021 04:29 IST2021-09-04T04:29:42+5:302021-09-04T04:29:42+5:30
कोल्हापूर : शहरातील फेरीवाल्यांसाठी सोमवारपासून गांधी मैदान येथील बाळासाहेब खराडे हॉल येथे ‘स्वनिधी से समृध्दी’ या शिबिराचे ...

फेरीवाल्यांसाठी सोमवारपासून ‘स्वनिधी से समृध्दी’ शिबिराचे आयोजन
कोल्हापूर : शहरातील फेरीवाल्यांसाठी सोमवारपासून गांधी मैदान येथील बाळासाहेब खराडे हॉल येथे ‘स्वनिधी से समृध्दी’ या शिबिराचे महापालिकेच्या वतीने आयोजन करण्यात आले आहे. दि. ९ सप्टेंबर पर्यंत ११ ते ३ या वेळेत हे शिबिर होणार आहे.
केंद्र शासन पुरस्कृत पी. एम. स्वनिधी योजनेची महानगरपालिका अंतर्गत अंमलबजावणी सुरु आहे. या योजने अंतर्गत शहरातील पथविक्रेत्यांना दहा हजार रुपयांपर्यंतचे कर्ज दिले जात आहे. आतापर्यंत शहरातील ४,७१३ फेरीवाल्यांनी त्याचा लाभ घेतला आहे. योजनेचा पुढील टप्पा म्हणून स्वनिधी से समृद्धी हे शिबिर राबविले जात आहे. ज्या लाभार्थ्यांना व त्यांच्या कुटुंबीयांना पात्रतेनुसार कर्ज प्राप्त झाले आहे. अशा लाभार्थ्यांना पी. एम. जीवन ज्योती बीमा योजना, पी. एम. सुरक्षा बीमा योजना, पी. एम. जनधन योजना, पी. एम. श्रमयोगी मानधन, वन नेशन वन रेशन कार्ड, पी. एम. मातृवंदना योजना, जननी सुरक्षा या शासकीय योजनेचा लाभ दिला जाणार आहे.
ज्या पथविक्रेत्यांचे कर्ज मिळाल्यानंतर सामाजिक आर्थिक प्रोफायलिंग झालेले आहे, अशांनी या शिबिराचा लाभ घ्यावा, तसेच ज्यांना दहा हजार रुपये कर्ज मिळाले आहे. पण, सामाजिक आर्थिक प्रोफायलिंग झालेले नाही, अशा पथविक्रेत्यांचे सामाजिक आर्थिक प्रोफायलिंग शिबिराच्या ठिकाणी करण्यात येईल. स्वनिधी से समृद्धी शिबिराचा लाभ सर्व फेरीवाल्यांनी घ्यावा असे आवाहन महानगरपालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.